People’s Choice Awards: सलग दुस-या वर्षीही हा अवॉर्ड जिंकणारी प्रियंका चोप्रा ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2017 01:03 PM2017-01-19T13:03:57+5:302017-01-19T13:18:40+5:30

बीटाऊनमध्ये सा-यांची मनं जिंकल्यानंतर 'क्वाँटीको सिरीज 2' च्या माध्यमातून  प्रियंका विदेशी रसिकांनाही घायाळ करतेय. हॉलिवूमडमध्ये एंट्री करण्यापूर्वीचं एक्झॉटीक म्हणत ...

Priyanka Chopra, the first Indian actress to win this year for the second successive year. | People’s Choice Awards: सलग दुस-या वर्षीही हा अवॉर्ड जिंकणारी प्रियंका चोप्रा ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

People’s Choice Awards: सलग दुस-या वर्षीही हा अवॉर्ड जिंकणारी प्रियंका चोप्रा ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

googlenewsNext
टाऊनमध्ये सा-यांची मनं जिंकल्यानंतर 'क्वाँटीको सिरीज 2' च्या माध्यमातून  प्रियंका विदेशी रसिकांनाही घायाळ करतेय. हॉलिवूमडमध्ये एंट्री करण्यापूर्वीचं एक्झॉटीक म्हणत प्रियंकानं आपल्या आवाजाने सा-यांना मंत्रमुग्ध केलं होतं. त्यानंतर अमेरिकन टीव्ही शो 'क्वाँटीको'च्या माध्यमातून  सा-यांची वाहवाही मिळवली. क्वाँटीकोच्या निमित्ताने का होईना या देसी गर्लला विदेशी चाहत्यांकडून खूप पसंती मिळतेय. सेकंड पीपल चॉईस अवॉर्ड  'क्वाँटीको 2साठीही पुन्हा एकदा ड्रामाटिक टीव्ही अभिनेत्री या कॅटेगिरीसाठी हा अवॉर्ड प्रिंयाकाने आपल्या नावावर केलाय.

गेल्या वर्षी 2016मध्ये 'पीपल चॉईस अवॉर्ड'च्या 'न्यू टीव्ही सिरीज' या कॅटेगिरीसाठी प्रियंकाला नॉमिनेश मिळालं होतं.विशेष म्हणजे हॉलिवूडमधल्या सगळ्या टॉप हिरोईन्सना मागे टाकत  हॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता वेन डीजलच्या हस्ते प्रियंकाला याच अवॉर्डने  गौरवण्यात आले होते.त्याचशिवाय हा पुरस्कार प्रियंकासाठी खूप स्पेशल  होता. कारण हा पुरस्कार मिळवणारी पिग्गी चॉप्स पहिली भारतीय अभिनेत्री ठरली होती.त्यामुळे सलग दुस-या वर्षीही या अवॉर्डची मानकरी प्रियंकाच ठरली असल्याने या देसी गर्लच्या प्रयत्नांना ख-या अर्थानं फळ मिळालंय अस बोलणं काही चुकीचं ठरणार नाहीय.




Web Title: Priyanka Chopra, the first Indian actress to win this year for the second successive year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.