आमचा कोहिनूर हिरा होती, विदेशींनी वाट लावली....! प्रियंका चोप्राची अतरंगी हेअरस्टाईल पाहून चाहते हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 09:34 AM2020-05-17T09:34:23+5:302020-05-17T09:43:55+5:30
गतवर्षी मेट गाला इव्हेंटमधील प्रियंकाच्या चित्रविचित्र लूकमुळे ती अशीच ट्रोल झाली होती. तिची या इव्हेंटमधील हेअरस्टाईल बघून भारतीय चाहते लोटपोट झाले होते.
कोरोना व्हायरसमुळे अनेक देश लॉकडाऊन आहेत. सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटीही आपआपल्या घरात कैद आहेत. प्रियंका चोप्रा ही सुद्धा लॉकडाऊनमुळे न्यूयॉर्कमधील तिच्या घरात अडकून पडली आहे. तूर्तास प्रियंकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या फोटोत प्रियंकाची अतरंगी हेअरस्टाईल बघून सगळेच हैराण आहेत. चाहत्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
व्हिडीओत प्रियंका बाथरोब घालून हेअरस्टाईल मिरवताना दिसतेय. वीकेंड अॅण्ड डान्स... असे कॅप्शन तिने हा व्हिडीओ शेअर करताना दिले आहे. मुळात हा व्हिडीओ प्रियंकाच्या एका फोटोशूटचा आहे.
युकेच्या एका मॅगझिनच्या मे महिन्याच्या अंकासाठी प्रियंकाने हे फोटोशूट केले होते़. कोरोना व्हायरसमुळे मॅगझिनचा हा अंक डिजिटली रिलीज केला गेला. हॉलिवूडच्या गतकाळातील थीमवर बेस्ड फोटोशूटसाठी प्रियंकाने ही अतरंगी हेअरस्टाईल केली होती.
तूर्तास प्रियंकाच्या या हेअरस्टाईलवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी यावरून प्रियंकाला ट्रोलही केले आहे.
‘मम्मी कहती थी दिमाग में भूसा भरा है, लगता है प्रियंका के दिमाग का वहीं भूसा बाहर आ गया है,’ असे एका युजरने यावर कमेंट करताना लिहिले. अन्य एका युजरने लिहिले, ‘प्रियंका आमच्या देशाचा कोहिनूर हिरा होती, पण या विदेशींनी तिची वाट लावली.’ काहींनी प्रियंकाची हेअरस्टाईल बघून तिला शाका लाका बूम बूमची पेन्सिल म्हटले.
गतवर्षी मेट गाला इव्हेंटमधील प्रियंकाच्या चित्रविचित्र लूकमुळे ती अशीच ट्रोल झाली होती. तिची या इव्हेंटमधील हेअरस्टाईल बघून भारतीय चाहते लोटपोट झाले होते. अनेकांनी तिची ही हेअरस्टाईल बघून तिला ट्रोल केले होते. पुढे अनेक महिने सोशल मीडियावर तिच्या या विचित्र लूकचीच चर्चा होती. कुणी तिला विक्रम वेताळ तर कुणी भूतनी म्हणून हिणवले होते.