प्रियंका चोप्राने हातावर काढला आहे खास टॅटू, निक जोनासचा नाही तर मग तो चेहरा कुणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 04:16 PM2024-09-16T16:16:25+5:302024-09-16T16:22:29+5:30

सध्या प्रियंका बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवतेय. जगभरात तिचा मोठा चाहता वर्गही आहे.

Priyanka Chopra has got a special tattoo daughter Malti Marie on her hand | प्रियंका चोप्राने हातावर काढला आहे खास टॅटू, निक जोनासचा नाही तर मग तो चेहरा कुणाचा?

प्रियंका चोप्राने हातावर काढला आहे खास टॅटू, निक जोनासचा नाही तर मग तो चेहरा कुणाचा?

 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) ही कायमच चर्चेत असते. सध्या प्रियंका बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवतेय. जगभरात तिचा मोठा चाहता वर्गही आहे. प्रियंकाची लेक मालतीचीही चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. तिचे फोटो समोर आले की लगेचच व्हायरल होतात.  आता प्रियंकाचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तिच्या हातावर एक खास टॅटू पाहायला मिळतोय. 

प्रियंका चोप्राच्या हातावर असलेला हा टॅटू निक जोनसचा नाही तर लेक मालती मेरीचा आहे.  'देसी गर्ल'ने आपल्या हातावर मालती मेरीच्या चेहऱ्याचा टॅटू काढला आहे. प्रियंकाचा तिच्या लेकीवर किती प्रेम आहे, हे या टॅटूमधून दिसून येत आहे. प्रियंकाला टॅटू काढायला फार आवडतात. तिच्या मनगटावरही Daddy's Lil Girl"  म्हणजेच वडिलांची छोटी मुलगी असा अर्थ असलेला टॅटू काढलेला आहे.  प्रियांकाच्या वडिलांचे 2013 मध्ये निधन झाले. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. याच्या एक वर्ष आधी २०१२ मध्ये अभिनेत्रीने हा टॅटू बनवला होता.


प्रियांकाने डिसेंबर 2018 मध्ये जोधपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार निक जोनासशी लग्न केले होते. त्यांची मुलगी मालती हिचा जन्म २०२२ मध्ये सरोगसीद्वारे झाला होता. प्रियंका कायमच सोशल मीडियावर मुलीसोबतचे फोटो शेअर करत असते. प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच  'द ब्लफ'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियंकानं 'द ब्लफ' सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान ती अनेकदा जखमीदेखील झाली होती. 
 

Web Title: Priyanka Chopra has got a special tattoo daughter Malti Marie on her hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.