गोविंदाच्या ‘मेरी पँट भी सेक्सी’ गाण्यावर नाचला प्रियंका चोप्राचा पती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 15:45 IST2019-04-07T15:45:00+5:302019-04-07T15:45:02+5:30
प्रियंका चोप्राने पती निक जोनासचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. प्रियंकाचा अमेरिकन हबी चक्क गोविंदाच्या ‘मेरी पँट भी सेक्सी’ गाण्यावर यात थिरकताना दिसतोय. तूर्तास हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय.

गोविंदाच्या ‘मेरी पँट भी सेक्सी’ गाण्यावर नाचला प्रियंका चोप्राचा पती!
प्रियंका चोप्राने पती निक जोनासचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. प्रियंकाचा अमेरिकन हबी चक्क गोविंदाच्या ‘मेरी पँट भी सेक्सी’ गाण्यावर यात थिरकताना दिसतोय. तूर्तास हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय.
प्रियंकाने ‘सकर’ या गाण्याच्या व्हिडीओवर गोविंदाच्या ‘मेरी पँट भी सेक्सी’ हे गाणे मॅशअप केले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्रियंकाने गोविंदालाही टॅग केले आहे.
जोनास ब्रदर्सचे ‘सकर’ हे सिंगल प्रचंड गाजले. यानंतर गत ५ एप्रिलला जोनास ब्रदर्सने ‘कूल टाइटल’ नामक दुसरे सिंगल रिलीज केले. ‘सकर’मध्ये निकसोबत प्रियंकाही दिसली होती. या दुसऱ्या गाण्यात मात्र प्रियंका नाही. पण पतीला या त्या पद्धतीने प्रमोट करण्याचे प्रियंकाचे प्रयत्न मात्र सुरु असतात. ताजा मॅशअप व्हिडीओही असाच एक प्रयत्न मानायला हरकत नाही.
तूर्तास लग्नानंतर प्रियंका हॉलिवूड-बॉलिवूड दोन्हींमध्ये संतुलन राखण्याच्या प्रयत्नात दिसतेय. काही दिवसांपूर्वी प्रियंकाचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला. लवकरच प्रियंका बॉलिवूडमध्ये परतणार आहे. ‘स्काय इज पिंक’ हा तिचा बॉलिवूडपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटात प्रियंका चोप्रा फरहान अख्तरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. प्रियंकाची ‘क्वांटिको’ हीअमेरिकन सीरिज प्रचंड गाजली होती. या शोने प्रियंकाला हॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख दिली.