परिणीतीच्या लग्नात प्रियांका चोप्राचा पती निक जोनास राहणार गैरहजर, मोठं कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 17:04 IST2023-09-18T17:04:21+5:302023-09-18T17:04:48+5:30
Parineeti-Raghav Wedding : मेहुणीच्या लग्नाला दिसणार नाही प्रियांका चोप्राचा पती निक जोनास, मोठं कारण समोर

परिणीतीच्या लग्नात प्रियांका चोप्राचा पती निक जोनास राहणार गैरहजर, मोठं कारण आलं समोर
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राची लगीनघाई सुरू आहे. परिणीती आप खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. जिकडेतिकडे परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. चाहतेही त्यांच्या लग्नासाठी उस्तुक आहेत. परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असतानाच आता एक नवी अपडेट समोर आली आहे.
उदयपूरमध्ये परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. दोन्ही कुटुंबीयांकडून त्यांच्या लग्नाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. पण, परिणीती चोप्राच्या लग्नात प्रियांका चोप्राचा पती निक जोनास हजर राहणार नसल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्रा आणि तिची लेक मालती परिणीतीच्या लग्नात उपस्थित असतील. पण निक जोनास मात्र मेहुणीच्या लग्नात गैरहजर असणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सध्या जोनास ब्रदर्स म्युझिक टूरवर आहेत. निकचे त्याचे भाऊ जो आणि केविनबरोबर काही शो आहेत. जोनास ब्रदर्सच्या या टूर प्लॅनिंगमध्ये निक जोनास जो आणि केविनबरोबर २३ सप्टेंबरला वॉशिंगटन येथे शो करणार आहे. तर २५ सप्टेंबरला पिट्सबर्ग येथे त्यांचा शो असणार आहे. याचदरम्यान परिणीती चोप्राचं लग्नही पार पडणार आहे. त्यामुळे निक जोनास परिणीतीच्या लग्नाला उपस्थित राहू न शकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परिणीती आणि राघवने मे महिन्यात साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता लग्नबंधनात अडकत ते नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.