'देसी गर्ल' बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक? प्रियंका चोप्रानं दिली मोठी हिंट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 04:25 PM2024-12-04T16:25:46+5:302024-12-04T16:26:23+5:30

प्रियंकाच्या बॉलिवूड कमबॅकबाबत एक अपडेट आलं आहे. 

Priyanka Chopra Jonas Confirms Bollywood Comeback In 2025 Gives Update | 'देसी गर्ल' बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक? प्रियंका चोप्रानं दिली मोठी हिंट, म्हणाली...

'देसी गर्ल' बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक? प्रियंका चोप्रानं दिली मोठी हिंट, म्हणाली...

Priyanka Chopra Bollywood Comeback : बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा परदेशात वास्तव्याला आहे. सातासमुद्रापार गेली असली तरी ती कायमच तिच्या देशाशी जोडलेली आहे.  प्रियंका गेल्या अनेक दिवसांपासून हॉलिवूड चित्रपट आणि सीरिज करतेय. पण, भारतीय चाहत्यांना तिच्या बॉलिवूड चित्रपटांची उणीव भासतेय. अशातच आता प्रियंकाच्या बॉलिवूड कमबॅकबाबत एक अपडेट आलं आहे. 

प्रियांका चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसलेली नाही. 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून प्रियांका हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रियांकाच्या कमबॅकच्या बातम्या येत होत्या. आता प्रियांकाने बॉलिवूडमधील तिचं कमबॅक कन्फर्म केलं आहे.

प्रियंका चोप्राने HT City शी बोलताना 2025 मध्ये बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याची हिंट दिली. ती म्हणाली, "मी मस्करी करत नाहीये, मी इथे अनेक चित्रपट निर्मात्यांना भेटले, स्क्रिप्ट वाचल्यात. मला हिंदीत काहीतरी करायचं आहे,  मी त्याच्या शोधात आहे. हे वर्ष माझ्यासाठी खरोखरच खूप व्यस्त होतं". यासोबत तिच्याकडे चाहत्यांसाठी खास काहीतरी असल्याचं तिने सांगितलं. 


प्रियंका चोप्रा फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटातून कमबॅक करणार होती. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होत्या. पण, या सिनेमाला विलंब होतोय. प्रियंकाला 'जी ले जरा'बद्दल विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाला, "तुम्हाला एक्सेलशी (फरहान अख्तरचे प्रोडक्शन हाऊस) याबद्दल बोलावे लागेल". दरम्यान, प्रियंका लवकरच 'हेड्स ऑफ स्टेट' आणि 'द ब्लफ'मध्ये दिसणार आहे. 'सिटाडेल 2' या वेबसिरीजमध्येही ती दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती याचे शूटिंग करत असूनयासंबंधीच्या पोस्ट शेअर करत असते. आता ती तिच्या पुढच्या बॉलिवूड चित्रपटाची घोषणा कधी करणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
 

Web Title: Priyanka Chopra Jonas Confirms Bollywood Comeback In 2025 Gives Update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.