४२व्या वर्षाही इतकी सुंदर कशी दिसते प्रियंका चोप्रा? 'देसी गर्ल' सांगतेय तिच्या सुंदर त्वचेचं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:31 IST2025-04-03T13:30:51+5:302025-04-03T13:31:07+5:30
प्रियंकाने आपल्या ग्लोइंग स्कीनचं सीक्रेट उघड केलं आहे.

४२व्या वर्षाही इतकी सुंदर कशी दिसते प्रियंका चोप्रा? 'देसी गर्ल' सांगतेय तिच्या सुंदर त्वचेचं रहस्य
Priyanka Chopra Jonas Skincare Secret: 'देसी गर्ल' प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिचा आत्मविश्वास, बोल्ड व्यक्तिमत्त्व अनेकांना आवडतं. मात्र, यापेक्षाही अधिक आकर्षक आहे तिची चमकदार त्वचा आणि सौंदर्य. ज्याचे गुपित जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. 'देसी गर्ल' चेहऱ्याला असं काय लावते, ज्यामुळे ती इतकी फ्रेश दिसते. आत नुकतच प्रियंकाने आपल्या ग्लोइंग स्कीनचं सीक्रेट उघड केलं आहे.
प्रियंकाने सोशल मीडियावर तिच्या स्किनकेअरचं गुपित शेअर केलं आहे. तिनं चेहऱ्यावर ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत करणाऱ्या सोप्या आणि प्रभावी सौंदर्य पद्धतीबद्दल सांगितलं. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर फेस शीट मास्क लावल्याचा एक फोटो पोस्ट केलाय. ज्यात ती फेस शीट मास्क लावून सोफ्यावर करताना दिसून येत आहे.
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती एसएस राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपटात महेश बाबूसोबत दिसणार आहे. यासोबतच ती "हेड्स ऑफ स्टेट" मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये तिन इद्रिस एल्बा आणि जॉन सीना सोबत स्क्रीन शेअर केली आहे. याव्यतिरिक्त ती "द ब्लफ"मध्ये दिसणार आहे.