Priyanka Chopra Marriage : निक जोनासची बॅचलर पार्टी होती या कंपनीने स्पॉन्सर्ड केलेली?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 11:37 AM2018-11-15T11:37:18+5:302018-11-15T11:46:39+5:30
प्रियांकोप्रमाणेच निक देखील त्याच्या फ्रेंड्ससोबत त्याची बॅचरल पार्टी एन्जॉय करत आहे. त्याने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या एका बॅचरल पार्टीचा एक फोटो पोस्ट केला होता. पण हा फोटो सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्रियांका चोप्रा लवकरच मिसेस निक जोनास होणार आहे. त्यापूर्वी पीसी सध्या आपले बॅचलर लाईफ एन्जॉय करतेय. अद्याप प्रियांका आणि निक जोनासच्या लग्नाची तारीख जाहीर झालेली नाही. पण येत्या १ डिसेंबरला जोधपूरमध्ये प्रियांका आणि निक लग्नगाठ बांधणार, असे म्हटले जात आहे. सध्या मात्र प्रियांका आपल्या जवळच्या मैत्रिणींसोबत अॅम्स्टर्डममध्ये बॅचलरेट एन्जॉय करतेय. वेगवेगळ्या फ्रेन्ड सर्कलसोबत वेगवेगळी पार्टी करतेय. अलीकडे प्रियांकाने तिच्या हॉलिवूडमधील फ्रेन्ड्स, चुलत बहीण परिणीती चोप्रा, ईशा अंबानीसोबत बॅचलरेट पार्टी केली. या सेलिब्रेशनचे फोटो परी आणि पीसीने सोशल मीडियावर शेअर केले होते.
प्रियांकोप्रमाणेच निक देखील त्याच्या फ्रेंड्ससोबत त्याची बॅचरल पार्टी एन्जॉय करत आहे. त्याने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या एका बॅचरल पार्टीचा एक फोटो पोस्ट केला होता. पण हा फोटो सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण या फोटोत तो एका जहाजावर दिसत असून त्याच्या समोर एलिट कंपनीची वोडकाची बॉटल आणि सोबत दोन ग्लास आहेत. एवढेच नव्हे तर त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये देखील या वोडका कंपनीला टॅग केले आहे. त्यामुळे त्याची ही बॅचरल पार्टी स्पोन्सर्ड होती का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
निक जोनासला इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर १७ दशलक्ष लोक फॉलो करतात. निक आणि प्रियांका दोघेही प्रचंड प्रसिद्ध असल्याने त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटीला विकले असून ३० नोव्हेंबरपासून प्रियांकाच्या लग्नाचे विधी सुरू होणार असल्याची चर्चा आहे.
प्रियांका आणि निक यांनी आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे.आता हे लग्न किती ग्रँण्ड होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. प्रियांका आणि निक दोघे राजस्थानमध्ये लग्न करणार असून हा एक खाजगी सोहळा असणार आहे.