गुगलवर आता प्रियंका चोप्रा ऐवजी येतंय प्रियंका सिंग, जाणून घ्या काय आहे ही भानगड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 07:32 PM2019-09-06T19:32:49+5:302019-09-06T19:33:13+5:30
गुगलवर प्रियंकाचं नाव चुकीचं दाखवलं जातं आहे.
बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा जगभरात प्रसिद्ध आहे. सर्वांना तिचं नाव चांगलंच परिचयाचं आहे. मात्र गुगलवर प्रियंकाचा नाव चुकीचं दाखवलं जातं आहे. प्रियंका चोपडा असतं तर चाललं असतं, प्रियंका जोनस असतं तरीही काही हरकत नव्हती. मात्र प्रियंकाचं नाव गुगलवर जे दाखवलं जातं ते नाहीच आहे.
खरंतर गुगलवर प्रियंका चोप्राचं नाव सर्च केल्यावर तिच्या प्रोफाईलवर प्रियंका सिंग हे नाव पहायला मिळतं आहे. गुगल सर्चच्या विकिपीडियाच्या बॉक्समध्ये प्रियंका चोप्राच्या नावाऐवजी प्रियंका सिंग असं पहायला मिळतंय. त्या बॉक्सवर क्लिक केल्यावर पुन्हा प्रियंका चोप्रा असं नाव दिसतंय. हे अद्याप समजू शकलेलं नाही की गुगलमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे की दुसरी काही समस्या आहे.
प्रियंकाने निक जोनससोबत मागील वर्षी डिसेंबरमध्ये लग्नबेडीत अडकली होती. त्यानंतर तिने तिचं नाव प्रियंका चोप्रा जोनस अधिकृत गेलं होतं. आतापर्यंत समजू शकलेलं नाही गुगलवर तिचं नाव सर्च केल्यानंतर तिचं सरनेम सिंग का दिसतंय.
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर प्रियंका लवकरच द स्काई इज पिंक चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर व जायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रियंका जायराच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाचा प्रीमियर कॅनडातील टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये १३ सप्टेंबरमध्ये होणार आहे. तर भारतात ११ ऑक्टोबरला प्रदर्शित करणार आहे. या चित्रपटातून प्रियंका बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. शेवटची ती बॉलिवूडमध्ये २०१६ साली जय गंगाजल चित्रपटात दिसली होती.