Priyanka Chopra : लाडकी लेक मालतीचं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेशन दणक्यात साजर करणार प्रियंका चोप्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 03:53 PM2022-12-20T15:53:31+5:302022-12-20T16:19:19+5:30

प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत निक जोनाससुद्धा दिसतोय.

Priyanka Chopra Nick Jonas outing with daughter Malti in new jersey for christmas | Priyanka Chopra : लाडकी लेक मालतीचं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेशन दणक्यात साजर करणार प्रियंका चोप्रा

Priyanka Chopra : लाडकी लेक मालतीचं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेशन दणक्यात साजर करणार प्रियंका चोप्रा

googlenewsNext

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)  पती निक जोनास (Nick Jonas) आणि मुलगी मालती मेरी (Malti Marie)सोबत व्हॅकेशनवर गेली आहे. प्रियंकाने तीन फोटो शेअर करत तिच्या न्यू जर्सी व्हेकेशनची झलक दाखवली आहे. प्रियंका आणि निकची मुलगी मालतीचं हे पहिलेच ख्रिसमस सेलिब्रेशन आहे, त्यामुळे अभिनेत्री खूप उत्साहित आहे आणि त्या क्षणाचा आनंद लुटताना दिसत आहे.


प्रियंका चोप्राने इंस्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहेत. दोन फोंटोमध्ये ती लेक मालतीला ख्रिसमसचे कलरफुल लाईट्स दाखवताना दिसत आहे. पिवळ्या विणलेल्या लोकरीच्या टोपीत मालतीचा चेहरा बाजूने दिसतो. तर प्रियंका आणि निक दोघेही एकाच फोटोत दिसत आहेत. प्रियंका मिरर सेल्फी घेत असताना, निक फ्रेममध्ये मोबाईलमध्ये बिझी दिसतोय. 

ब्लॅक अँड व्हाइट विंटर आउटफिटमध्ये प्रियंका चोप्रा क्युट दिसतेय. अभिनेत्रीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'परफेक्ट विंटर डेज' असे लिहिलंय. प्रियांका आणि निकसाठी हा ख्रिसमस खास आहे, कारण या वर्षी ते सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. त्यामुळे यावेळीच ख्रिसमस सेलिब्रेशन खास होणार आहे. प्रियंकाची मुलगी जानेवारीत एक वर्षाची होणार आहे. मालतीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत, पहिल्या वाढदिवसाला मालतीचा चेहरा पाहायला मिळेल अशी आशा आहे.

Web Title: Priyanka Chopra Nick Jonas outing with daughter Malti in new jersey for christmas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.