Priyanka Nick Wedding : रॉयल वेडिंग, रॉयल अंदाज...असे सजले प्रियांकाचे घर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 11:29 AM2018-11-26T11:29:20+5:302018-11-26T11:30:51+5:30

प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास येत्या आठवड्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. २८ नोव्हेंबरपासून रंगणा-या या विवाहसोहळ्यासाठी प्रियांकाचे मुंबईतील घर नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे.

Priyanka Chopra Nick Jonas Wedding: pc mumbai residence which is decorated with lights to welcome jamai raja | Priyanka Nick Wedding : रॉयल वेडिंग, रॉयल अंदाज...असे सजले प्रियांकाचे घर!!

Priyanka Nick Wedding : रॉयल वेडिंग, रॉयल अंदाज...असे सजले प्रियांकाचे घर!!

googlenewsNext
ठळक मुद्दे१ डिसेंबरला हळदीचा कार्यक्रम होईल. २ डिसेंबरला प्रियांका व निक लग्नबंधनात अडकतील.२ डिसेंबरला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला हे कपल ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकणार आहे. दोन्ही पद्धतीने लग्न एकाच ठिकाणी पार पडणार आहे.

प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास येत्या आठवड्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. २८ नोव्हेंबरपासून रंगणा-या या विवाहसोहळ्यासाठी प्रियांकाचे मुंबईतील घर नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. केवळ प्रियांकाचे घरचं नाही तर तिच्या घरासमोरचे रस्तेही विद्युत रोषणाई सजवण्यात आले आहेत. हे फोटो पाहता प्रियांका व निकचे लग्न शाही होणार, यात कुठलीही शंका नाही.


वेडिंग वेन्यूपर्यंत प्रियांका व निक दोघेही हेलिकॉप्टरने पोहोचणार आहेत. लग्नाचे व-हाडीही जोधपूर एअरपोर्टवरून हेलिकॉप्टरनेच थेट वेडिंग मेन्यूपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे उमेद पॅलेसमध्ये एक हेलिपॅड उभारण्यात येत आहे.

निक आणि प्रियांका दोघेही प्रचंड प्रसिद्ध असल्याने त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटीला विकले गेले असल्याचेही कळतेय.

२९ नोव्हेंबरला प्रियांकाच्या हातांवर निकच्या नावाची मेहंदी रचेल. यानंतर ३० नोव्हेंबरला जोधपूरच्या मेहरानगड किल्लयात संगीत सेरेमनी होईल. याच दिवशी प्रियांका व निक कॉकटेल पार्टी होस्ट करतील. यात केवळ प्रियांका व निकचे जवळचे मित्र व नातेवाईक सामील होतील.

१ डिसेंबरला हळदीचा कार्यक्रम होईल. २ डिसेंबरला प्रियांका व निक लग्नबंधनात अडकतील.२ डिसेंबरला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला हे कपल ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकणार आहे. दोन्ही पद्धतीने लग्न एकाच ठिकाणी पार पडणार आहे.

लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. यापैकी एक दिल्लीत होईल तर दुसरे मुंबईत.

जोधपूरच्या उमेद भवन येथे प्रियांका लग्न करणार आहे.  उमेद भवन हे भारतातील प्रसिद्ध हॉटेलपैकी एक आहे. उमेद भवन हा पू्र्वी राजमहाल होता. पण आता त्याचे रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. उमेद भवन अतिशय भव्य असून त्याची सजावट ही अतिशय सुंदर आहे. उमेद भवन हे मोठाले असून त्यात सगळ्या आधुनिक सुविधा देखील आहे. त्यामुळे याचे भाडे देखील प्रचंड आहे. उमेद भवनचे केवळ एका रात्रीचे भाडे ४३ लाख असल्याचे म्हटले जात आहे. या पॅलेसमध्ये विविध सुट असून त्यांच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. प्रियांका चोप्राच्या कुटुंबियांनी या हॉटेलमध्ये ६५ रुम बुक केल्या आहेत.

Web Title: Priyanka Chopra Nick Jonas Wedding: pc mumbai residence which is decorated with lights to welcome jamai raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.