सनी देओलच्या ‘गदर २’चं यश पाहून प्रियांका-निक भारावले, दिग्दर्शकाला लिहिलं पत्र, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 06:20 PM2023-08-22T18:20:35+5:302023-08-22T18:21:02+5:30
Gadar 2: 'गदर २'च्या यशासाठी प्रियांका-निकने केलं दिग्दर्शकाचं अभिनंदन, पाठवली खास भेट
सनी देओलचा ‘गदर २’ दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम करत आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या गर्दीत ‘गदर २’ बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. सनी देओलच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत होते. आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरल्याचं चित्र आहे. ‘गदर २’चे शो हाऊसफूल होत आहेत. सनी देओलच्या ‘गदर २’चं यश पाहून बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनसही भारावून गेले आहेत.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने ‘गदर २’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांना गदर २च्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी फुलांचा गुच्छ आणि त्याबरोबर एक पत्रही अनिल शर्मा यांना पाठवलं आहे. अनिल शर्मा यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन त्याचा फोटो शेअर केला आहे. “अनिल सर, ‘गदर २’च्या यशासाठी तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढील प्रोजेक्टसाठी शुभेच्छा, प्रियांका आणि निक”, असं त्यांनी लिहिलं आहे. अनिल शर्मा यांनी प्रियांका आणि निकचे आभार मानले आहेत.
“पहिलेच मुख्यमंत्री...”, एकनाथ शिंदेंचा केईम रुग्णालयातील व्हिडिओ शेअर करत मराठी अभिनेत्याची पोस्ट
Thx @priyankachopra and @nickjonas for your warm wishes ... it really touched my heart #Gadar2 🙏❤️ pic.twitter.com/juPlHjc5TR
— Anil Sharma (@Anilsharma_dir) August 21, 2023
प्रियांका चोप्राने ‘गदर २’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ स्पाय’ या चित्रपटात ती झळकली होती. या चित्रपटात प्रियांकासह सनी देओल आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते.
‘चांद्रयान ३’ची खिल्ली उडवणं महागात पडलं, प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल
दरम्यान, ‘गदर २’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झालेल्या गदरचा सिक्वेल आहे. तब्बल २२ वर्षांनी आलेल्या गदरच्या सीक्वेलसाठी प्रेक्षक आतुर होते. या चित्रपटात सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. ११ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची ४०० कोटींकडे वाटचाल सुरू आहे.