प्रियंका चोप्रा-निक जोनासचं बाळ आहे प्री-मॅच्युअर, डिलिव्हरी डेटच्या 12 आठवडे आधी झाला जन्म!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 04:02 PM2022-01-22T16:02:29+5:302022-01-22T16:17:35+5:30
रिपोर्टनुसार, दक्षिण कॅलिफोर्नियाच्या हॉस्पिटलमध्ये प्रियंका (Priyanka Chopra) आणि निक (Nick Jonas)च्या बाळाचा जन्म झाला आहे.
प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) आई-बाबा झाल्यानंतर चाहत्यांसह त्यांचे मित्रही खूप खूश आहेत. 'देसी गर्ल'ने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच, बॉलिवूड(Bollywood) आणि हॉलिवूडचे (Hollywood) सेलिब्रिटी दोघांवर अभिनंदनचा वर्षाव करत आहेत.
सरोगसीद्वारे प्रियंका आणि निक आई-बाबा झालेत. प्रियांकाने तिच्या पोस्टमध्ये खुलासा केलेला नाही की तिला मुलगी झालय की मुलगा. मात्र मीडिया रिपोर्टनुसार प्रियंका एक मुलीची (Priyanka Chopra welcome baby Girl) आई झाली आहे. लग्नाला 3 वर्षे झाल्यानंतर प्रियंकाच्या घरी पाळणा हलला आहे. प्रियांका आई झाल्यामुळे खूप आनंदी आहे.
प्री-मॅच्युअर आहे बाळ
डेली मेल यूकेच्या रिपोर्टनुसार, प्रियंका एका चिमुकल्या परीची आई झाली आहे. प्रियांका-निकची मुलगी प्री-मॅच्युअर आहे, कारण बाळाचा जन्म डिलिव्हरी डेटच्या तारखेपासून 12 आठवडे आधी झाला आहे.
रिपोर्टनुसार, दक्षिण कॅलिफोर्नियाच्या हॉस्पिटलमध्ये प्रियंका आणि निकच्या बाळाचा जन्म झाला आहे. जोपर्यंत नवजात बाळ निरोगी होत नाही तोपर्यंत तो हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहील. बाळ पूर्णपणे निरोगी झाल्यानंतरच प्रियांका आणि निक त्याला घरी घेऊन जाऊ शकतील. मात्र, या वृत्तांवर प्रियांका किंवा निक जोनासची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. प्रियांका चोप्राने तिच्या कामाच्या सर्व कमिटमेंट्स पूर्ण केल्या होत्या. जेणेकरून बाळाच्या जन्मानंतर तिला मातृत्वाचा आनंद घेता येईल.