पर‘देसी’ गर्ल प्रियांका चोप्राला कशाची वाटते भीती?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 07:55 AM2018-08-08T07:55:13+5:302018-08-08T07:55:13+5:30

बॉलिवूडचं नव्हे तर हॉलिवूड गाजवणाऱ्या या ग्लोबल स्टारला सर्वाधिक भीती कशाची वाटते?

priyanka chopra recently reveals her biggest fear | पर‘देसी’ गर्ल प्रियांका चोप्राला कशाची वाटते भीती?

पर‘देसी’ गर्ल प्रियांका चोप्राला कशाची वाटते भीती?

googlenewsNext

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सध्या जोरात आहे. दोघांनी साखरपुडा केला, असेही मानले जात आहे. पण प्रियांका सध्या तरी यावर काहीही बोलण्याच्या मूडमध्ये नाही. हे माझे आयुष्य आहे आणि काही गोष्ट केवळ माझ्यापर्यंतचं मर्यादीत ठेवण्याचा मला पूरेपूर हक्क आहे, असे सांगून प्रियांकाने निकबद्दलच्या बातम्यांवर बोलण्यास नकार दिला आहे. आता प्रियांकाचा नकार म्हटल्यावर तिला कोण आग्रह करणार? तूर्तास तरी आम्ही निकबद्दल नाही तर प्रियांकाच्या आयुष्यातील एका वेगळ्याच गोष्टीवर बोलणार आहोत. होय, बॉलिवूडचं नव्हे तर हॉलिवूड गाजवणाऱ्या या ग्लोबल स्टारला सर्वाधिक भीती कशाची वाटते? या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

 कुठलाही गॉडफादर नसताना प्रियांकाने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली. हॉलिवूडमध्येही जम बसवला. पण याच प्रियांकाला एका गोष्टीची प्रचंड भीती वाटते, ती म्हणजे, अपयशाची. होय, अलीकडे एका मुलाखतीत प्रियांका यावर बोलली. मला अपयशाची प्रचंड भीती वाटते. अपयश या शब्दाबद्दलचं माझ्या मनात तिरस्कार आहे. मी अपयश खपवूचं शकत नाही. एखादे काम करताना मला अपयश आलेच तर माझी आई मला एकटं सोडते. काही वेळासाठी तिला एकटं सोडा, एवढेच ती म्हणते, असे प्रियांका चोप्रा यावेळी म्हणाली.
करिअरच्या सुरूवातीला खरे तर प्रियांकाने अनेक नकार पचवले आहेत. अपयशाची चवही चाखली आहे. पण आता तिला अपयशाचे तोंडही पाहायचे नाही आणि कदाचित तिचे हे म्हणणे योग्यही आहे. शेवटी इथपर्यंत पोहोचायला तिने प्रचंड मेहनत केली आहे.

Web Title: priyanka chopra recently reveals her biggest fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.