'भारत'मध्ये प्रियांका चोप्राला सलमानाची ही अभिनेत्री करणार रिप्लेस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 02:21 PM2018-07-30T14:21:56+5:302018-07-30T14:23:02+5:30

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत' वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे. शेवटच्या क्षणी प्रियांका चोप्राने बॅकआऊट केलेयं.

Priyanka Chopra replaces Salman's actress in bharat | 'भारत'मध्ये प्रियांका चोप्राला सलमानाची ही अभिनेत्री करणार रिप्लेस

'भारत'मध्ये प्रियांका चोप्राला सलमानाची ही अभिनेत्री करणार रिप्लेस

googlenewsNext
ठळक मुद्दे 'टायगर जिंदा है'नंतर कॅटरिना कैफ आणि सलमान खान पुन्हा एकत्र दिसणार‘भारत’ चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत' वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे. शेवटच्या क्षणी प्रियांका चोप्राने बॅकआऊट केलेयं. प्रियांकाने या सिनेमात काम करण्यास नकार दिल्याने सगळ्यांना आश्चर्य वाटले आहे. प्रियांकाने एक्झिट घेतल्यानंतर या सिनेमासाठी नव्या अभिनेत्रीचा शोध शुरु झाला आहे. 


प्रियांकानंतर या सिनेमासाठी कॅटरिना कैफ आणि जॅकलीन फर्नांडिसचे नाव चर्चेत आहे, मात्र त्याची अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. निर्माता आणि दिग्दर्शक अली अब्बास जफरने शेवटी कॅटरिना कैफच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.  'टायगर जिंदा है'नंतर कॅटरिना कैफ आणि सलमान खान पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. कॅटरिनाच्या नावाची घोषणा करताना अली म्हणाला की, मी पुन्हा एकदा सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीसोबत काम करण्यास उत्सुक आहे.   


‘भारत’ चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडील फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात कॅट व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये ‘भारत’चे शूटींग सुरु झाले. या शेड्यूलच्या काही भागात सर्कसचे काही सीन्स शूट केले जात आहेत. चित्रपटाच्या कथेनुसार, सलमानला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी सर्कशीत काम करावे लागते. यात तो ‘मौत का कुआँ’मध्ये मोटरसायकलवर चित्तथरारक कसरती करताना दिसेल. त्याच्यासोबत या काळात दिशा पटानीही दिसणार असल्याचे समजते आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे. 
 

Web Title: Priyanka Chopra replaces Salman's actress in bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.