मॅनहॅटन दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावली प्रियांका चोप्रा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 07:58 AM2017-11-01T07:58:38+5:302017-11-01T13:28:38+5:30
न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सगळे जग हादरले. संपूर्ण जगाला हादरवून सोडणा-या या हल्ल्यातून अभिनेत्री प्रियांका चोप्रा अगदी थोडक्यात ...
न यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सगळे जग हादरले. संपूर्ण जगाला हादरवून सोडणा-या या हल्ल्यातून अभिनेत्री प्रियांका चोप्रा अगदी थोडक्यात बचावली. होय, कारण प्रियांकाच्या न्यूयॉर्कमधील घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर हा हल्ला झाला. मॅनहॅटनमध्ये एका भरधाव ट्रकने पादचारी आणि वाहनचालकांना चिरडले. यात ८ ठार तर १२ जण जखमी झालेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या संबंधित ट्रकचालकालाही अटक केली आहे. सेफुओ साईपोव असे हल्लेखोराचे नाव आहे.त्याचे वय २९ वर्षे असल्याचे कळते.
हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा प्रियांका घराच्या वाटेवर होती. तिने खुद्द ट्विटरवर याची माहिती दिली आहे. ‘ माझ्या घरापासून पाच ब्लॉक सोडून हा हल्ला झाला. मी कामावरून परतत होती. जगाची काय अवस्था झालीयं, हे नैराश्य पसरविणा-या सायरन्सचा आवाज ऐकून कळते. शांती...’, असे ट्विट प्रियांकाने केले आहे. एकंदर काय तर केवळ नशीब बलवत्तर म्हणून प्रियांका या हल्ल्यातून बचावलीयं.
ALSO READ: प्रियांका चोप्राबद्दलच्या या वैयक्तिक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?
या ट्विटपूर्वी प्रियांकाने हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या होत्या. ‘एनवायसी...नेहमीप्रमाणे जिंदादिल...आय लव्ह यू...हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे,’अशा शब्दांत तिने आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या होत्या.
तूर्तास प्रियांका बॉलिवूडऐवजी हॉलिवूडमध्ये व्यस्त आहे. नुकताच प्रियांकाचा ‘बेवॉच’ हा हॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला. अलीकडे प्रियांकाने आणखी तीन हॉलिवूड सिनेमे हातावेगळे केले. सध्या ती ‘क्वांटिको’ या अमेरिकन मालिकेच्या तिसºया सीझनमध्ये बिझी आहे. ‘क्वांटिको’चे दोन्ही सीझन यशस्वी झाल्यानंतर प्रियांकाची या मालिकेच्या तिसºया सीझनमध्येही वर्णी लागली आहे. सध्या याच मालिकेच्या शूटींगमध्ये प्रियांका बिझी आहे. तूर्तास प्रियांकाकडे एकही बॉलिवूड प्रोजेक्ट नाही. पण पीसीचे भारतीय चाहते तिला पाहण्यास आतूर आहे. मध्यंतरी प्रियांका पी.टी. उषा हिच्या बायोपिकमध्ये झळणार अशी बातमी होती. अर्थात प्रियांकाने या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. प्रियांका शेवटची ‘बाजीराव मस्तानी’मध्ये दिसली होती. तेव्हापासून ती हॉलिवूडमध्ये व्यस्त आहे.