भन्साळींच्या चित्रपटात जमणार सलमान खान-प्रियंका चोप्राची जोडी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 14:38 IST2019-02-25T14:33:08+5:302019-02-25T14:38:28+5:30
सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’मध्ये प्रियंका झळकणार होती. पण ऐनवेळी प्रियंकाने या चित्रपटातून अंग काढून घेतले आणि तिच्या जागी कॅटरिना कैफला घ्यावे लागले. प्रियंकाच्या या वागण्यामुळे भाईजान प्रचंड संतापला होता.

भन्साळींच्या चित्रपटात जमणार सलमान खान-प्रियंका चोप्राची जोडी?
प्रियंका चोप्रा आणि सलमान खान यांच्यातील भांडण कदाचित संपलेय. होय, सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’मध्ये प्रियंका झळकणार होती. पण ऐनवेळी प्रियंकाने या चित्रपटातून अंग काढून घेतले आणि तिच्या जागी कॅटरिना कैफला घ्यावे लागले. प्रियंकाच्या या वागण्यामुळे भाईजान प्रचंड संतापला होता. सलमानने स्पष्ट शब्दांत आपली नाराजी बोलून दाखवली होती.
‘भारत’ सोडण्याच्या निर्णयामागे तिची आपली कारणे होती. पण आमचा प्रोजेक्ट अटकला. आम्हाला आधी ठाऊक असते तर कदाचित आम्ही काहीतरी मार्ग काढला असता. ‘भारत’मध्ये प्रियंकाचे काम केवळ ७०-८० दिवसांचे होते. लग्न करायचे तर चार दिवस तयारीला अन चार दिवस लग्नाला लागतात. आठ दिवसांचे लग्न आणि मग हनीमून. आम्ही अॅॅडजस्ट करायला तयार होतो. आम्ही सांभाळून घेऊ, असे आम्ही तिला सांगितले. पण नंतर मला हा चित्रपट करायचाच नाही, असे तिने आम्हाला सांगितले. माझ्यासोबत काम करायचे म्हणून प्रियांकाने माझी बहीण अर्पिला हजारदा फोन केला होता, असे सलमान म्हणाला होता. पण आता कदाचित सलमान हे सगळे विसरलाय. प्रियंका व निकच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावून सलमानने हे आधीच दाखवून दिले. आता तर प्रियंकासोबत काम करण्यासही सलमान राजी झाला आहे. होय, ताजी चर्चा ऐकून तरी तेच वाटतेय. होय, ‘कॉफी विद करण 6’च्या फिनाले एपिसोडमध्ये खुद्द प्रियंकाने तसे संकेत दिलेत.
संजय लीला भन्साळी व विशाल भारद्वाज यांच्यापैकी कुणासोबत काम करायला तुला आवडेल? असा प्रश्न करणने प्रियंकाला विचारला. यावर प्रियंकाचे उत्तर काय असावे? तर मी या दोन्ही दिग्दर्शकांसोबत काम करतेय, असे ती म्हणाली. संजय लीला भन्साळी सलमानसोबत पुन्हा एकदा काम करणार, अशी बातमी चर्चेत असताना प्रियंकाने दिलेले हे उत्तर ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. प्रियंका व सलमानची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार, असेच प्रियंकाच्या या उत्तरावरून दिसतेय. यापूर्वी ‘तुसी ग्रेट हो’. ‘सलाम-ए- इश्क’आणि ‘मुझसे शादी करोगी’ अशा चित्रपटात सलमान - प्रियंकाची जोडी दिसलीय.