विरह संपला; निक प्रियंकाला भेटला...! या रोमॅन्टिक फोटोवर चाहते फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 11:33 IST2021-08-04T10:39:32+5:302021-08-04T11:33:16+5:30
प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा फोटो इतका रोमॅन्टिक आहेत की, क्षणात तो व्हायरल झाला.

विरह संपला; निक प्रियंकाला भेटला...! या रोमॅन्टिक फोटोवर चाहते फिदा
प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा फोटो इतका रोमॅन्टिक आहेत की, क्षणात तो व्हायरल झाला. (Priyanka Chopra and Nick Jonas Photo Viral) अनेक दिवसांच्या विरहानंतर हे जोडपं भेटलं आणि त्यांच्या पे्रमाला बहर आला.
प्रियंका चोप्रा सध्या ‘सिटाडेल’च्या शूटींगसाठी लंडनमध्ये आहे. तर निक अमेरिकेत होता. अशात दोघांनाही विरह असह्य झाला आणि निक प्रियंकाजवळ पोहोचला. मग काय, अनेक महिन्यानंतर एकमेकांना भेटून दोघेही भावुक झालेत. जणू दोघेही अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटत आहे तशी ही भेट होती.
प्रियंकाने अगदी लहान मुलाला मिठीत घ्यावे तसे निकला घट्ट मिठीत घेतले. हा रोमॅन्टिक क्षण कॅमे-यात कैद झाला आणि पीसीने तो सोशल मीडियावर शेअर केला. ‘He’s home’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले. या फोटोत प्रियंकाच्या चेह-यावरचा शांत भाव बघण्यासारखा आहे. अगदी शांत मनाने ती त्या क्षणाचा आनंद घेत असल्याचे दिसतेय.
गेल्या काही तासांत 16 लाखांवर लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. चाहत्यांनी प्रियंका व निकच्या या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. निक व प्रियंकाच्या या सुंदर फोटोने आजचा माझा दिवस खास बनवला, असे एका युजरने या फोटोवर कमेंट करताना लिहिले. अनेकांनी या कपलला आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
प्रियंका व निक या दोघांमध्ये वयाचे मोठे अंतर आहेत. यावरून दोघे अनेकदा ट्रोलही होतात. पण दोघांनाही याची पर्वा नाही. दिवसेंदिवस दोघांमधील नातं अधिकच घट्ट होताना दिसतेय. हा फोटो त्याचा पुरावा म्हणायला हवा.