जावा जावांचं बिनसलं, सोफी टर्नर-प्रियंका चोप्राने एकमेकींना केलं अनफॉलो, घटस्फोट आहे कारणीभूत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 12:57 IST2023-10-14T12:56:09+5:302023-10-14T12:57:37+5:30
प्रियंका आणि सोफीचे एकत्र फोटो पाहून लोक त्यांच्या चांगल्या बॉन्डचे कौतुक करायचे, पण...

जावा जावांचं बिनसलं, सोफी टर्नर-प्रियंका चोप्राने एकमेकींना केलं अनफॉलो, घटस्फोट आहे कारणीभूत?
जो जोनास आणि सोफी टर्नर यांच्या घटस्फोटामुळे केवळ एका नात्यात नाही तर सोफी टर्नरचे कुटुंबातील इतर सदस्यांसोबतचे नातेही दुरावा आल्याचं दिसतंय. अभिनेत्री प्रियांका चोप्राचा दीर जो जोनास आणि अभिनेत्री सोफी टर्नर यांच्या घटस्फोटाची बातमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. दोघांनी नुकतेच हे नातं संपुष्टात आणण्याची घोषणा केली. सासरी सुरू असलेल्या भांडणाचा परिणामा जावा-जावांच्या नात्यावर झाल्याचं दिसतंय. दोघींनी एकमेकींना सोशल मीडियावरून अनफॉलो केलं आहे.
प्रियंका आणि सोफीचे एकत्र फोटो पाहून लोक त्यांच्या चांगल्या बॉन्डचे कौतुक करायचे. दोघेही अनेक वर्षे एकमेकांचे चांगल्या मैत्रिणी होत्या. सोफी टर्नरने प्रियांका चोप्राला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं असलं तरी ती अजूनही जो, केविन आणि त्याची पत्नी डॅनियल जोनासला फॉलो करत आहे. प्रियांकाने जो आणि सोफीच्या सुरू असलेल्या घटस्फोटावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
2020 च्या एका मुलाखतीत, सोफी म्हणाली होती, 'प्रीसोबत हा एक प्रकारचा वेडेपणा आहे. तुम्हाला स्वतःला आठवण करून द्यावी लागेल की बॉलिवूडमध्ये ती 20 वर्षांपासून काम करतेय. ती भारतातील सर्वात मोठी अभिनेत्री आहे... जेव्हा आम्ही तिच्या आणि निकच्या लग्नासाठी तिथे गेलो होतो तेव्हा आम्ही राजेशाही थाट अनुभवला आहे.
जो आणि सोफी ही जोडी २०१६ पासून एकमेकांना डेट करत होती. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये साखरपुडा केला. तर, २०१९ मध्ये लग्न केलं. त्याचसोबत या जोडीला दोन मुलीदेखील आहेत. पहिल्या मुलीचे नाव विलाअसून ती तीन वर्षांची असून दुसरी मुलगी अवघ्या 14 महिन्यांची आहे.