VIDEO: प्रियांका चोप्राच्या मिस वर्ल्ड गाउनचा निघाला होता टेप, 'नमस्ते' करत सांभाळही होती स्थिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 12:50 PM2020-11-06T12:50:11+5:302020-11-06T12:51:00+5:30

एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने सांगितले होते की, तिचे दोन आउटफिट फारच अनकम्फर्टेबल ठरले होते. यातील एक ड्रेस तो होता जो तिने मिस वर्ल्ड २००० ब्यूटी पेजेंट दरम्यन घातला होता.

Priyanka Chopra speaks about her two most uncomfortable outfits | VIDEO: प्रियांका चोप्राच्या मिस वर्ल्ड गाउनचा निघाला होता टेप, 'नमस्ते' करत सांभाळही होती स्थिती...

VIDEO: प्रियांका चोप्राच्या मिस वर्ल्ड गाउनचा निघाला होता टेप, 'नमस्ते' करत सांभाळही होती स्थिती...

googlenewsNext

प्रियांका चोप्रा तिच्या आउटफिट आणि स्टाइलसाठी नेहमीच चर्चेत राहते. आता तर ती ग्लोबल फॅशनिस्टाजमध्ये गणली जाते. रेड कार्पेटपासून ते सिंपल आउटफिटपर्यंत तिचे आउटफिट चर्चेत राहतात. पण हे आउटफिट कॅरी करणं काही सोपं नाही. वेगवेगळ्या अवॉर्डमधील तिचे कपडेही चर्चेचा विषय ठरत असतात.

एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने सांगितले होते की, तिचे दोन आउटफिट फारच अनकम्फर्टेबल ठरले होते. यातील एक ड्रेस तो होता जो तिने मिस वर्ल्ड २००० ब्यूटी पेजेंट दरम्यन घातला होता.

प्रियांकाने सांगितले होते की, व्हाईट आयकॉनिक ड्रेस टेपला चिकटली होती. ओढताण झाल्याने टेप निघाली होती. पण प्रियांका वेळेवर परिस्थिती सांभाळत नमस्कारची पोज दिली होती. पीसीने सांगितले की, लोकांना वाटत होतं की, हा नमस्कार आहे. पण मुळात नमस्कार मी माझा ड्रेस सांभाळण्यासाठी केला होता.

मेट गालामध्येही आउटफिटमुळे हैराण झाली होती प्रियांका

प्रियांकाने तिच्या आणखी एका पॉप्युलर लूकबाबत सांगितलं की, हा लूक मेट गाला २०१८ चा होता. तिने सांगितलं की, या ब्लड रेड Ralph Lauren आउटफिमध्ये गोल्ड कलरचा हुडी जोडलेला होता. यात आतून कोरसेट होता. त्यामुळे असं वाटत होतं की, तिच्या शेप बदललाय. प्रियांका या श्वासही घेऊ शकत नव्हती. इतकेच नाही तर डीनरवेळी प्रियांका पोटभर जेवणही करू शकली नाही.
 

Web Title: Priyanka Chopra speaks about her two most uncomfortable outfits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.