कधी बॉडी शेमिंग तर कधी वर्णभेदाची शिकार, त्यानंतर 60 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम;आज बनली ती ग्लोबल स्टार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 07:26 PM2023-03-23T19:26:09+5:302023-03-23T19:28:19+5:30
एक काळ असा होता जेव्हा प्रियंकाला काळी मांजर देखील म्हटले जायचं.
चित्रपटसृष्टीत खूप कमी लोक आहेत ज्यांना सहज यश मिळाले आहे. एखाद्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी कलाकाराला स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते संघर्ष करावा लागतो. प्रियंका चोप्रा ही देखील अशीच एक सुपरस्टार आहे जिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियंका चोप्राने अभिनय, गायन आणि नृत्य या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. मात्र अभिनेत्रीला अनेकदा लोकांचे टोमणेही ऐकावे लागले.
आज ग्लोबल स्टार बनलेल्या प्रियांका चोप्रानेही तिच्या करिअरमध्ये या टप्प्यावर पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. कधी बॉडी शेमिंग तर कधी वर्णभेदाची शिकार झाली प्रियंका. एक काळ असा होता जेव्हा तिला काळी मांजर देखील म्हटले जायचे, तरीही देसी गर्लने तिच्या टॅलेंटच्या जोरावर आज स्वतःला ग्लोबल स्टार बनवले आहे.
प्रियांका चोप्राने स्वतः तिच्या एका मुलाखतीत अभिनेता आणि अभिनेत्रीना मिळणाऱ्या मानधनात असलेल्या तफावतीबद्दल आणि स्टार्समधील बॉडी शेमिंग यांसारख्या मुद्द्यांवर स्वतः चर्चा केली होती. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला बॉडी शेमिंगची शिकार ठरल्याचं अभिनेत्रीने म्हटले होते. लोक त्याच्याबद्दल खूप काही बोलायचे. त्या काळात लोक तिला डस्की, काळी मांजर असं बरेच काही म्हणायचे. त्या लोकांमुळे टॅलेंट असूनही गरजेपेक्षा जास्त काम करावे लागले, असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे.
आज आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यासाठी ओळखली जाणारी देसी गर्ल प्रियंका म्हणते की, एकेकाळी तिला बॉडी शेमिंगचा शिकार व्हावे लागले होते. तिने सांगितले की एकेकाळी तिला काळी मांजर देखील म्हटले जात असे.
प्रियंका चोप्रा तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आज ग्लोबल स्टार बनली आहे. 2000 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. मात्र अभिनयाच्या दुनियेत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यांच्या अभिनय कारकिर्दीत तिने हिरो, फॅशन यांसारख्या चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. प्रियंकाने 2018 साली अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले आणि सध्या अमेरिकेत तिचे आनंदी जीवन जगत आहे.