दीराच्या लग्नात रडताना दिसली प्रियंका चोप्रा, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 12:09 IST2019-07-03T12:05:29+5:302019-07-03T12:09:45+5:30
प्रियंका चोप्राचा दीर जो जोनस नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. गेम ऑफ थ्रोन्स फेम अभिनेत्री सोफी टर्नरसोबत त्यांने लग्न केलं आहे.

दीराच्या लग्नात रडताना दिसली प्रियंका चोप्रा, फोटो व्हायरल
प्रियंका चोप्राचा दीर जो जोनस नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. गेम ऑफ थ्रोन्स फेम अभिनेत्री सोफी टर्नरसोबत त्यांने लग्न केलं आहे. आपल्या दीराच्या लग्नात प्रियंका ट्रेडिशनल अंदाजात दिसली.सोफी टर्नरचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.मात्र या सगळ्यात एक फोटो सध्या सगळ्यांचा चर्चा विषय ठरला आहे तो प्रियंकाचा. या फोटोत प्रियंका रडताना दिसतेय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत प्रियंका डोळ्यातील अश्रू पुसताना दिसतेय. या फोटोत प्रियंका इमोशन झालेली पाहायला मिळतेय. कदाचित दीराचा लग्न पाहून प्रियंकाला आपल्या लग्नाची आठवण झाली असावी. प्रियंका पिंक कलरच्या साडीत खूपच सुंदर दिसतेय.
वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर प्रियंकाचा ‘स्काय इज पिंक’ बॉलिवूड सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटात प्रियंका चोप्रा फरहान अख्तरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
फरहान अख्तर व प्रियंका चोप्रा आयशाच्या आई- वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. द स्काय इज पिंक' सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. या सिनेमाची कथा १३ वर्षीय आयशा चौधरीभोवती फिरते. या वयात तिला पल्मनरी फाइब्रोसिस हा आजार होतो. त्यानंतर ती मोटिवेशनल वक्ता बनते. त्यानंतर ती कधीच हार मानत नाही. वयाच्या १८व्या वर्षी तिचे निधन होते. या सिनेमाचे शूटिंग मुंबई, लंडन व अंदमानमध्ये करण्यात आले आहे. प्रियंकाचे फॅन्स या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतील यात काही शंका नाही. 'द स्काय इज पिंक' सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस होणार आहे.