सुभाष घईंच्या 'यादें' मध्ये करीनाच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री; या कारणामुळे दिलेला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 03:57 PM2024-12-06T15:57:11+5:302024-12-06T16:03:37+5:30
सुभाष घई हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहेत.
Subhash Ghai : ९० च्या दशकात बॉक्स ऑफिसवर एकामागोमाग बरेच रोमॅंटिक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील काही सिनेमे सुपरहिट ठरले तर काही फ्लॉप झाले. त्याकाळी सुभाष घई (Subhash Ghai) दिग्दर्शित 'यादें' चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan)आणि करीना कपूर (Kareena Kapoor) मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. परंतु 'यादें' मधील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पसंत पडली नाही. हा चित्रपट तेव्हा फ्लॉप झाला. पण, हा चित्रपट करिनाला नाही तर एका दुसऱ्याच अभिनेत्रीला ऑफर करण्यात आला होता. दिग्दर्शक सुभाष घई यांनी 'यादें' साठी प्रियंका चोप्राच्या (Priyanka Chopra) नावाला पसंती दिली होती.
सुभाष घई 'यादें' चित्रपटाच्या वेळी हृतिक रोशनसोबत एक नवा चेहरा पडद्यावर आणण्याच्या तयारीत होते. त्याचदरम्यान त्यांनी प्रियंका चोप्राचं नाव सूचलं. कारण प्रियंकाने त्यावेळी नुकताच 'मिस वर्ल्ड' हा किताब जिंकला होता. याचा खुलासा सुभाष घई यांनी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या ट्रिविया स्टोरीमध्ये केला होता.
या कारणामुळे प्रियंकाने चित्रपटाला दिला नकार
'यादें'मध्ये हृतिकसोबत प्रियंका चोप्राला कास्ट करावं अशी सुभाष घई यांची इच्छा होती. पण, प्रियंका एका वेगळ्याच प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने तिला त्यांच्यासोबत काम करणं शक्य नव्हतं. त्यामुळे अभिनेत्रीने चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
प्रियंकाने नकार दिल्यानंतर सुभाष घई यांनी या प्रोजेक्टसाठी अभिनेत्री अमिषा पटेलला विचारणा केली होती. पण तिचंही शेड्यूल बिझी होतं. अमिषाने सुद्धा या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. या दोन्ही अभिनेत्रींनी नकार दिल्यानंतर अखेर स्क्रीप्ट करिना कपूरला दाखवण्यात आली. करीनाला या चित्रपटाचं कथानक आवडलं आणि तिने होकार दिला. अभिनेत्री 'यादें' चित्रपटात जॅकी श्रॉफ यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसली. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करु शकला नाही. पण त्यातील गाणी मात्र सुपरहिट ठरली.