सनी देओलला पहिल्यांदा भेटल्यानंतर प्रियांका चोप्राची घाबरली होती, नेमकं काय घडलं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 14:22 IST2023-11-17T13:53:43+5:302023-11-17T14:22:44+5:30
सनी देओलसोबत 'द हीरो'मध्ये हिंदी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.

सनी देओलला पहिल्यांदा भेटल्यानंतर प्रियांका चोप्राची घाबरली होती, नेमकं काय घडलं होतं?
प्रियंका चोप्रा ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. पण तिने हिंदी चित्रपटांपासून सुरु झालेल्या आपला प्रवास हॉलिवूडपर्यंत नेला आहे. आज ती एक ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. 2002 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या प्रियंकाने तामिळ सिनेमातून आपला प्रवास सुरू केला. यानंतर तिला सनी देओलसोबत 'द हीरो'मध्ये हिंदी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. प्रियंका खूप खूश होती पण तिचा सनीसोबत काम करण्याचा अनुभव हैराण करणार होता. याचा खुलासा स्वतः प्रियंका चोप्राने एका मुलाखतीत केला होता.
एका मुलाखतीत प्रियंका चोप्राने सांगितले होते की, माझं वय तेव्हा १७ ते १८ वर्षांचे होते. मी सनी देओलसोबत पहिल्यांदा सिनेमात काम करत होते. 'दे हिरो'च्या सेटवर जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा प्रचंड घाबरले होते, थरथर कापायला लागले होते. मी त्याचे सिनेमा पाहून मोठे झाले होते. मी बरेली सारखा एका छोट्या शहरातून आले होते त्यामुळे सनी देओलसोबत काम करण्याबाबत मी कधी विचारदेखील नव्हता केला. जेव्हा संधी मिळाली तेव्हा मला विश्वास बसत नव्हता.
काही महिन्यांपूर्वी प्रियांकाची सिटाडेल ही हॉलिवूड वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता लवकरच ती ‘हेड्स ऑफ स्टेट’ या हॉलिवूड सिनेमात झळकणार आहे. याशिवाय ती 'केजीएफ' सारखा सुपरहिट सिनेमा देणारे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या सिनेमात ज्युनिअर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप मेकर्सकडून अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही.