प्रियांका - निकचं लग्नानंतरचे पहिलं धमाकेदार ख्रिसमस सेलिब्रेशन, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 15:35 IST2018-12-25T15:30:24+5:302018-12-25T15:35:03+5:30
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपला नवरा निक जोनास आणि कुटुंबीयांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट करते आहे. प्रियांकाने आपल्या सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत

प्रियांका - निकचं लग्नानंतरचे पहिलं धमाकेदार ख्रिसमस सेलिब्रेशन, पाहा फोटो
संपूर्ण जगात सध्या ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरु आहे. मग बॉलिवूडचे कलाकार तरी कसे मागे राहातील. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपला नवरा निक जोनास आणि कुटुंबीयांसोबत ख्रिसमस सेलिब्रेट करते आहे.
प्रियांकाने आपल्या सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्या फोटोंमध्ये सगळेच सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसतायेत. या फोटोमध्ये प्रियांकाच्या सासऱ्यांच्यासोबत तिची आई मधु चोप्रासुद्धा दिसतायेत.
प्रियांका सध्या तिच्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये एन्जॉय करतेय. लंडनला रवाना होण्याआधी प्रियांकाने मुंबईत ग्रँड रिसेप्शन दिले. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
गत १ व २ डिसेंबरला दोघेही लग्नबंधनात अडकले. जोधपूरच्या उमेद भवन येथे हा शाही विवाहसोहळा पार पडला.प्रियांका व निक दोघेही ग्लोबल स्टार असल्याने या लग्नाची प्रचंड चर्चा झाली. निक एक हॉलिवूड सिंगर आहे आणि प्रियांकाने अनेक हॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे. लग्नापूर्वी प्रियांकाने बॉलिवूडचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट हातावेगळा केला. या चित्रपटात प्रियांका फरहान अख्तरसोबत दिसणार आहे. लग्नानंतर प्रियांका पुन्हा एकदा अभिनयाकडे वळणार आहे आणि भन्साळींसारख्या ‘लार्जर दॅन लाईफ’ दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करणार आहे. साहजिकच, आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे या यापूर्वी ह्यसात खून माफह्ण या चित्रपटात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती.