प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनसची गजब सवय, वाचून म्हणाल - 'नवरा असावा तर असा!'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 02:06 PM2020-12-23T14:06:04+5:302020-12-23T14:08:05+5:30
प्रियंका चोप्रा आणि निक जोनसची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. लग्नापूर्वी त्या दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले होते. त्या दोघांची जोडी खूप क्यूट आहे आणि ते दोघे बऱ्याचदा मस्ती करताना दिसतात.निक जोनससोबत लग्न केल्यानंतर प्रियंका चोप्राने त्याच्याबद्दल मजेशीर खुलासे केले आहेत.
एका मुलाखतीत प्रियंका चोप्राने निक जोनसबद्दल विचित्र खुलासा केला की, सकाळी उठल्यावर सर्वात पहिल्यांदा बेडरूममध्ये तो काय करतो. प्रियंका चोप्राने मागील वर्षी एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले होते. यावेळी प्रियंकाने लग्नापासून निक जोनसशी निगडीत बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला होता. प्रियंका चोप्राने निक जोनसबद्दल खूप रोमँटिक गोष्टी सांगितल्या होत्या.
प्रियंका चोप्रा म्हणाली होती की, तिचा नवरा नेहमी तिच्याकडे आकर्षित होत असतो आणि दररोज सकाळी उठल्यावर तिचा चेहरा पाहतो. त्यावर ती म्हणाली होती की, हे थोडे विचित्र आहे पण निक जोनस दररोज सकाळी उठल्यावर माझा चेहरा बघतो जेव्हा मी सकाळी झोपेतून उठते तेव्हा. मस्करीत प्रियंकाने पुढे सांगितले की, निक जेव्हा मला असा पाहते तेव्हा मी त्याला बोलते एक मिनिट थांब मी थोडा मेकअप करते.
जेव्हा निक मला पाहतो तेव्हा मला थोडे विचित्र वाटते. मी फक्त हेच म्हणते की मला झोप येते आहे पण तो नेहमी माझे झोप असलेले डोळे पाहून अप्रतिम आणि गोडंस दिसते असे म्हणतो. थोडे विचित्र आहे पण ठीक आहे. जर त्याला हे आवडते तर, असे प्रियंका सांगत होती. ती म्हणाली की, मी मस्करी करत नाही. खरेच अप्रतिम वाटते.
प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती द व्हाइट टाइगर आणि वी कॅन बी हिरोजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे.