प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनसला रुग्णालयात केले होते दाखल, वाचा नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 11:07 AM2021-05-18T11:07:57+5:302021-05-18T11:08:27+5:30
निक जोनसला रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्यावर प्रियंका चोप्रा व त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत.
बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनस बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. दरम्यान आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, निक जोनस टेलिव्हिजन शोदरम्यान सेटवर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्जदेखील मिळाला असल्याचे समजते आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निक जोनसला शनिवारी टेलिव्हिजन शोच्या सेटवर दुखापत झाली होती आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अद्याप समजू शकले नाही की त्याला दुखापत कशी झाली. आता रविवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर सोमवारी 'द वॉईस'च्या नाईट एपिसोडमध्ये दिसला.
निक जोनास याचा 'स्पेसमॅन' हा स्टुडिओ अल्बम नुकताच प्रसिद्ध झाला आहे. एक अभिनेता म्हणून तो 'जुमानजी : वेलकम टू जंगल', 'मिडवे' आणि 'कॅओस वॉकिंग'मध्ये दिसला होता. २३ मे २०२१ रोजी निक बिलबोर्ड संगीत पुरस्कारांचे आयोजन करणार आहे.
प्रियांका आणि निक दोघांच्याही मदतीसाठी नेहमी पुढे असतात. आजकाल प्रियंका कोरोना संकटाला सामोरे जाणाऱ्यांना खूप मदत करत आहे. प्रियांका भलेही भारतापासून दूर असेल, पण तिने आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भारतासाठी काम सुरू ठेवले आहे.
प्रियंका आणि निक जोनस एकमेकांच्या प्रेमात पडले १ डिसेंबर २०१८ रोजी हिंदू पद्धतीने तर २ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने दोघांचं लग्न झालं होतं. दोनही स्टार्सचे शेड्यूल खूप बिझी असते, मात्र तरीही ते एकमेकांसाठी वेळ काढतात. दोघे मिळून जगभराची सैर करतात.