​‘हा’ असेल प्रियांका चोप्राचा दुसरा भोजपुरी चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2017 02:18 PM2017-01-16T14:18:41+5:302017-01-16T14:18:41+5:30

प्रियांका चोप्रा विदेशात तिचे करिअर ‘शेप अप’ करण्यात गुंतली आहे आणि इकडे भारतात तिची आई मधू चोप्रा पीसीच्या प्रॉडक्शन ...

Priyanka Chopra's second Bhojpuri film will be 'Ha!' | ​‘हा’ असेल प्रियांका चोप्राचा दुसरा भोजपुरी चित्रपट!!

​‘हा’ असेल प्रियांका चोप्राचा दुसरा भोजपुरी चित्रपट!!

googlenewsNext
रियांका चोप्रा विदेशात तिचे करिअर ‘शेप अप’ करण्यात गुंतली आहे आणि इकडे भारतात तिची आई मधू चोप्रा पीसीच्या प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारी सांभाळून आहेत. लवकरच ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ या प्रियांकाच्या प्रॉडक्शन हाऊसचा दुसरा भोजपुरी सिनेमा आपल्याला पाहायला मिळणार आहे.
 ‘पर्पल पेबल पिक्चर्स’आपला दुसरा भोजपुरी चित्रपट ‘काशी अमरनाथ’ घेऊन येत आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर मुंबईत या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले. या चित्रपटात रवि किशन, निरहुआ, आम्रपाली दुबे आणि सपना गिल मुख्य भूमिकेत आहेत. सपना या चित्रपटाद्वारे भोजपुरी इंडस्ट्रीत पाऊल ठेवते आहे. 


मुंबईच्या फ्युचर स्टुडिओत चित्रपटाचे शूटींग सुरू झाले. सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक महेश पांडे यांनी मुहूर्त शॉट दिला आणि चित्रपटाचे पहिला शॉट चित्रीत केला गेला. यावेळी प्रियांकाची आई मधू चोप्रा उपस्थित होत्या.या शॉटमध्ये अयाज खान स्विमिंग पुलमध्ये आहे तर सुशील सिंह, मनोज टायगर व सोनिया मिश्रा स्विमिंग पुलजवळ कुठल्याशा गंभीर मुद्यावर चर्चा करताना दिसतात.
 ‘बम बम बोल रहा है काशी’ हा ‘पर्पल पेबल पिक्चर्स’चा पहिला भोजपुरी चित्रपट होता.  ‘बम बम बोल रहा है काशी’ च्या तुलनेत ‘काशी अमरनाथ’ एक वेगळ्या फ्लेवरचा चित्रपट असेल. मुंबईशिवाय बिहार व झारखंडमध्ये या चित्रपटाचे शूटींग पार पडेल.  यानंतरच प्रियांकाच्या या दुस-या भोजपुरी चित्रपटास प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, ते सुद्धा कळेल.
प्रियांका सध्या  ‘क्वांटिको’च्या दुसºया सीझनच्या शूटींगमध्ये बिझी आहे. दोन दिवसांपूर्वी या शोचा एक अ‍ॅक्शन सीन शूट करताना प्रियांका जखमी झाली होती. अर्थात तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

Web Title: Priyanka Chopra's second Bhojpuri film will be 'Ha!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.