प्रियांका चोप्राला आता हवा नफ्यातील वाटा!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 08:11 AM2018-07-15T08:11:04+5:302018-07-15T08:11:04+5:30

होय, प्रियांकाने एका बॉलिवूड चित्रपटाच्या नफ्यातील काही टक्के रक्कम मागितली असल्याची खबर आहे. 

Priyanka demands profit share for her next? | प्रियांका चोप्राला आता हवा नफ्यातील वाटा!!

प्रियांका चोप्राला आता हवा नफ्यातील वाटा!!

googlenewsNext

चित्रपटाच्या नफ्यातील काही टक्के वाटा मागणारे अनेक अभिनेते बॉलिवूडमध्ये आहेत. सलमान खान, आमिर खान, शाहरूख खान अशी अनेकांची नावे घेता येतील. याच अभिनेत्यांच्या धर्तीवर अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने असा प्रयत्न करून पाहिला होता. होय, सर्वप्रथम दीपिकाने ‘फायडिंग फेनी’ या चित्रपटाच्या नफ्यातील काही वाटा मागितल्याची खबर होती. किंबहुना याच अटीवर तिने हा चित्रपट साईन केल्याचेही कानावर आले होते. (आता दीपिकाचा ‘फायडिंग फेनी’ बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला, हा भाग अलहिदा. ) यानंतर ‘पद्मावत’ या चित्रपटावेळीही दीपिकाला नफ्यातील वाटा हवा होता. पण ‘पद्मावत’च्या मेकर्सनी दीपिकाला मागेल ती फी देऊ केली आणि दीपिकाने नफ्यातील वाट्यावर पाणी सोडले. आता दीपिकाची सर्वात मोठी स्पर्धकही हाच कित्ता गिरवताना दिसणार असल्याचे कळतेय.  इंडस्ट्रीत दीपिकाची सर्वात मोठी स्पर्धक कोण, हे नव्याने सांगायची गरज नाही. होय, प्रियांका चोप्रा. प्रियांकाने एका बॉलिवूड चित्रपटाच्या नफ्यातील काही टक्के रक्कम मागितली असल्याची खबर आहे. निश्चितपणे हा चित्रपट ‘भारत’ नाही. या चित्रपटाचे नाव आहे, ‘स्काय इज पिंक’. सोनीली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर लीड भूमिकेत आहेत. अभिनेत्री जायरा वसीमही यात दिसणार आहे. प्रियांका यात जायराच्या आईची भूमिका साकारणार आहे. याच चित्रपटासाठी प्रियांकाला चित्रपटाच्या कमाईतील काही हिस्सा हवा आहे. तो किती, हे अद्याप कळलेले नाही. पण सूत्रांच्या मते, चित्रपटाची अधिकृत घोषणा होण्याआधी याबाबतचा निर्णय घेतला जाईल. हा निर्णय प्रियांकाच्या बाजूने लागलाच तर ती चित्रपटाच्या नफ्यातील वाटा घेणारी बॉलिवूडची पहिली अभिनेत्री ठरणार आहे.

Web Title: Priyanka demands profit share for her next?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.