प्रियांकाच्या नवऱ्याची होणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री? निकने स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 01:19 PM2021-12-02T13:19:51+5:302021-12-02T13:20:33+5:30

Nick jonas: प्रियांकाप्रमाणेच निकनेदेखील भारतीय चित्रपटांमध्ये काम करावं अशी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे निकने बॉलिवूड पदार्पणाविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे. 

Priyanka's husband to make an entry in Bollywood? Nick revealed himself | प्रियांकाच्या नवऱ्याची होणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री? निकने स्वत: केला खुलासा

प्रियांकाच्या नवऱ्याची होणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री? निकने स्वत: केला खुलासा

googlenewsNext

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा (priyanka chopra).  बॉलिवूडमध्ये हक्काचं स्थान निर्माण केल्यानंतर प्रियांकाने तिचा मोर्चा हॉलिवूड चित्रपटांकडे वळवला. देशात लोकप्रिय असलेली ही देसी गर्ल विदेशातही लोकप्रियता मिळवण्यास यशस्वी ठरली. त्यामुळे प्रियांका आज ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियांकाने  २०१८मध्ये अमेरिकन गायक निक जोनाससोबत  (nick jonas) लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे प्रियांकाप्रमाणेच निकनेदेखील भारतीय चित्रपटांमध्ये काम करावं अशी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे येत्या काळात निक बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकणार का? असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित होत आहे. यामध्येच आता निकने बॉलिवूड पदार्पणाविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे. 

अलिकडेच निकने एका मुलाखतीत बॉलिवूड पदार्पणाविषयी त्याचं मत मांडलं. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये त्याला काम करायची इच्छा असल्याचं त्याने म्हटलं आहे. 

"प्रियांकासोबत माझं लग्न झाल्यापासून मी अनेक भारतीय चित्रपट पाहिले, गाणीही ऐकली. हे चित्रपट प्रेरणादायी असतात. माझं लग्नही भारतात झालं. त्यामुळे लग्नानंतर अनेक कार्यक्रमांसाठी मी भारत दौरा केला. या काळात अनेक भारतीय लोकांशी भेटलो. बॉलिवूड कलाकारांशी भेटलो, त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. ते सगळेच जण मला बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात", असं निक म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "आमच्या घरी पार्टी किंवा कोणताही कार्यक्रम असला की आम्ही बॉलिवूडचीच गाणी लावतो. खरंतर आमच्या घरी पार्टीला फक्त भारतीयच पाहुणे नसतात तर अमेरिकेतील काही असतात. पण, त्यांनादेखील भारतीय गाणी आवडतात.  भारतीय गाण्यांविषयी मला विचाराल तर माझ्याकडे एकच शब्द आहे तो म्हणजे 'अभूतपुर्व'. मला अशा सुंदर भारतीय चित्रपटसृष्टीत काम करायला नक्कीच आवडेल. पण जर तशी चांगली ऑफर मिळाली तर मी नक्कीच बॉलिवूडमध्ये काम करेन."

दरम्यान, १ डिसेंबर २०१८ रोजी निक आणि प्रियांकाने राजस्थानमध्ये लग्न केले होते. तेव्हापासून ही जोडी सातत्याने चर्चेत येत. अलिकडेच प्रियांकाने एका कार्यक्रमात तिच्या प्रेग्नंसीविषयी वक्तव्य करुन चाहत्यांना बुचकळ्यात पाडलं होतं. 
 

Web Title: Priyanka's husband to make an entry in Bollywood? Nick revealed himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.