प्रियाचा चाललाय 'टाईमपास'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:20 AM2016-01-16T01:20:38+5:302016-01-29T11:15:59+5:30

तशा लहान वयातच प्रियाने आपल्या करिअरला सुरुवात केली असली तरी काही मोजक्याच चित्रपटात प्रियाचे वेगळेपण पाहायला मिळाले आहे. काहींना ...

Priya's busy 'Timepass' | प्रियाचा चाललाय 'टाईमपास'

प्रियाचा चाललाय 'टाईमपास'

googlenewsNext
ा लहान वयातच प्रियाने आपल्या करिअरला सुरुवात केली असली तरी काही मोजक्याच चित्रपटात प्रियाचे वेगळेपण पाहायला मिळाले आहे. काहींना असा गैरसमज असतो, की आपल्या सौंदर्यावर आपण फेमस होऊ, आपल्याला अनेक चांगले रोल मिळतील, अशीच काहीशी अवस्था सध्या प्रियाची असल्यासारखी वाटते. तिच्या सुंदर दिसण्यावर ती चांगले चित्रपट मिळू शकतात, असे तिला वाटत असावे, पण प्रियाने हे लक्षात घेतले पाहिजे, की चित्रपटसृष्टी असो, मालिका असो वा रंगमंच. या प्रत्येक ठिकाणी सौंदर्यापेक्षा अभिनयाला आणि तुमच्या टॅलेंटला जास्त महत्त्व दिले जाते. उगाच स्वत:च्या दिसण्यावर विसंबून न राहता स्वत:तील अभिनेत्रीला डेव्हलप करण्याची सुबुद्धी सेल्फीतील बाप्पाने प्रियाला दिली असेल तर ठीक आहे. गर्ल नेक्स्ट डोअर आणि ग्लॅमरस या डायलेमामध्ये अडकलेल्या प्रिया बापटचा टाईमपास सुरू झाला आहे. एकीकडे सई ताम्हणकर मराठीतील ग्लॅमरस भूमिकांची आयडॉल बनली, तर दुसरीकडे मुक्ता बर्वेने साध्या पण गर्ल नेक्स्ट डोअर भूमिका साकारून प्रियाची ती जागाही हिरावून घेतली. त्यामुळे आपल्या करिअरबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ प्रियावर आली आहे. भेट या मराठी चित्रपटातून या प्रिया बापटने पदार्पण केले आणि नंतर मुन्नाभाई एम.बी.बी.एस, लगे रहो मुन्नाभाई, शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श, ईम प्लीजटा अशी मराठी-हिंदीची मजल-दरमजल करीत टाईमपास २ पर्यंत ती पोहोचली आणि यशाच्या उच्च शिखरावर असल्याचे तिला वाटू लागले.
यादरम्यान काकस्पर्श आणि टाईमपास २ या चित्रपटात केतकी माटेगावकरच्या मोठेपणीची भूमिका तिने केली. पण या सर्वात ती हे विसरली, की तमाम प्रेक्षकांनी प्रियाच्या अभिनयाची तुलना केतकी माटेगावकरशी केली आणि त्यात सरस ठरली ती केतकीच. इतकेच नाही तर काकस्पर्शनंतर प्रियाला अशा काही खास मुख्य भूमिकाही मिळाल्या नाहीत. विशेष न चाललेला आंधळी कोशिंबीर, तसा साईड रोलच म्हणावा लागेल, असा चित्रपट म्हणजे लोकमान्य- एक युगपुरुष आणि नंतर काय तर म्हणे भुताची भूमिका साकारलेला हॅप्पी जर्नी असे विशेष स्तुती न झालेले चित्रपट प्रियाला मिळाले.
प्रिया बापटचा दोन वर्षांपूर्वी चाहतावर्ग मोठय़ा प्रमाणात वाढला होता. फेसबुक, व्टिटरवर त्याचे प्रत्यंतरही आले. मात्र टाईमपास २ नंतर प्रियाचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला नाही. चित्रपट तर चांगले मिळाले नाहीतच; पण त्यामुळे तिच्या चाहत्यांनीही आपला मोर्चा मुक्ता बर्वेसारख्या दमदार अभिनेत्रीकडे वळवला. मुक्ताने एकसो- एक चांगले चित्रपट दिलेच, त्याशिवाय रंगमंचही ती सध्या गाजवत आहे, तर दुसरीकडे प्रिया रंगमंचावरही फार काळ टिकू शकली नाही, कारण अल्पावधीतच नवा गडी नवं राज्य या नाटकावर टाईमप्लीज चित्रपटात नशीब आजमावयाची तिला बहुधा घाई झाली असावी. तशा लहान वयातच प्रियाने आपल्या करिअरला सुरुवात केली असली तरी काही मोजक्याच चित्रपटात प्रियाचे वेगळेपण पाहायला मिळाले आहे. काहींना असा गैरसमज असतो, की आपल्या सौंदर्यावर आपण फेमस होऊ, आपल्याला अनेक चांगले रोल मिळतील, अशीच काहीशी अवस्था सध्या प्रियाची असल्यासारखी वाटते. तिच्या सुंदर दिसण्यावर ती चांगले चित्रपट मिळू शकतात, असे तिला वाटत असावे, पण प्रियाने हे लक्षात घेतले पाहिजे, की चित्रपटसृष्टी असो, मालिका असो वा रंगमंच. या प्रत्येक ठिकाणी सौंदर्यापेक्षा अभिनयाला आणि तुमच्या टॅलेंटला जास्त महत्त्व दिले जाते. उगाच स्वत:च्या दिसण्यावर विसंबून न राहता स्वत:तील अभिनेत्रीला डेव्हलप करण्याची सुबुद्धी सेल्फीतील बाप्पाने प्रियाला दिली असेल तर ठीक आहे. फू'६ी''>े१४ल्लें८ीे.ं१ं३ँी''ें३.ूे/फू'६ी''> फू'६ी''>ऋीं३४१ी/फू'६ी''>

Web Title: Priya's busy 'Timepass'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.