निर्माता आनंद एल राय यांच्या सिनेमाचे बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाले कौतुक, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 07:27 PM2023-02-24T19:27:35+5:302023-02-24T19:30:36+5:30
आनंद एल राय यांनी तेनु वेड्स मनु, रांझना आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
आनंद एल राय यांनी तेनु वेड्स मनु, रांझना आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या आगामी सिनेमा आत्मपॅम्फ्लेटची 73 व्या बर्लिन चित्रपट महोत्सवात निवड करण्यात आली आहे. यावर निर्माता आनंद एल राय यांनी आभार व्यक्त केली आहे.
आनंद एल राय म्हणाले"मी ७३ व्या बर्लिन चित्रपट महोत्सवात आलो आहे आणि आत्मपॅम्फलेटच्या प्रदर्शनानंतर, प्रेक्षकांनी उत्तम कथानकाची प्रशंसा केली. प्रादेशिक सिनेमातील हे माझे पहिले पाऊल आहे आणि याला आधीच जागतिक यश मिळाले आहे. जागतिक प्रेक्षक जेव्हा तुमचे साक्षीदार होतात तेव्हा ही अभिमानाची भावना असते. आपण काम करतो आणि त्याची प्रशंसा करतो. सर्वांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञ आहे",
आत्मपॅम्फ्लेट चे लेखन परेश मोकाशी यांनी केले असून दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय, भूषण कुमार, कृष्ण कुमार, कनुप्रिया ए अय्यर, झी स्टुडिओ आणि मायासभा यांनी केली आहे.