अमिताभ बच्चन बनले दिग्दर्शक, उणे तापमानात केले शूट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 11:17 AM2019-12-17T11:17:16+5:302019-12-17T11:18:06+5:30
होय, अमिताभ यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कामाप्रती कमालीचे प्रामाणिक आहेत. आता हेच बघा ना, डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतरही अमिताभ यांनी उणे तापमानात ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाचे शूटींग केले. हे शूटींग आटोपत नाही तोच ते ‘चेहरे’ या सिनेमाच्या शूटींगसाठी स्लोवाकियाला रवाना झालेत. पण बातमी केवळ एवढीच नाही. खरी बातमी पुढे आहे. ‘चेहरे’ या चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे.
Team #Chehre@emraanhashmi@SrBachchan@SiddhanthKapoor @anandpandit63 in #Slovakia | #EmraanHashmipic.twitter.com/GMPok5zARz
— Emraanians (@Emraanians) December 15, 2019
होय, ‘चेहरे’च्या शूटींगसाठी निर्माता आनंद पंडित आणि अन्य स्टारकास्ट स्लोवाकियाला गेले. येथे अमिताभ यांनी ‘चेहरे’च्या मेकिंगसंदर्भात स्वत:च्या काही कल्पना निर्मात्यांपुढे मांडल्या. शिवाय या चित्रपटाचे काही दृश्यांचे दिग्दर्शनही केले. खुद्द आनंद पंडित यांनी ही माहिती दिली आहे.
Lock the date !! pic.twitter.com/MhItC8gtEs
— Emraan Hashmi (@emraanhashmi) November 9, 2019
आनंद पंडित यांनी सांगितले की, ‘चेहरे’ या चित्रपटाच्या शूटने आम्हाला अनमोल स्मृती दिल्यात. शूट संपले तेव्हा आम्ही सगळेच भावूक झालो होतो. तापमान शून्याच्याही खाली गेले होते. ते पाहून आता शूट शक्य नाही, असेच आम्हाला वाटले होते. पण अमिताभ बच्चन यांचा उत्साह दांडगा होता. ते सर्वांच्या आधी सेटवर पोहोचत. ‘चेहरे’च्या शूटींगदरम्यान अमिताभ यांनी स्वत:च्या काही कल्पना मांडल्या. त्या कल्पना इतक्या सुंदर होत्या की आम्ही लगेच त्या स्वीकारल्या. त्यांनी दोन सीन्सचे दिग्दर्शनही केले.
My film #Chehre Last Schedule first day in #Slovakia with @SrBachchan@annukapoor_@emraanhashmi#DritimanChatterjee@anandpandit63@apmpicturespic.twitter.com/JY1VBumLKI
— Rumy Jafry (@rumyjafry) December 11, 2019
गत 15 ऑक्टोबरला अमिताभ यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर 18 ऑक्टोबरला त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. सध्या त्यांचे चार चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो, ब्रह्मास्त्र या चित्रपटांत अमिताभ झळकणार आहेत.
‘चेहरे’ या सिनेमात इमरान हाश्मी आणि क्रिस्टल डिसूजा मुख्य भूमिकेत आहेत.