खरे की काय? शायनी अहुजाच्या आयुष्यावर येणार बायोपिक?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 12:13 PM2019-03-18T12:13:24+5:302019-03-18T12:13:36+5:30
अभिनेता शायनी अहुजा दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. पण आता शायनीशी संबंधित एक खास बातमी आहे. होय, कधीकाळी बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगाची हवा खाणा-या शायनीच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची तयारी सुरु झाली आहे.
अभिनेता शायनी अहुजा दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. पण आता शायनीशी संबंधित एक खास बातमी आहे. होय, कधीकाळी बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगाची हवा खाणा-या शायनीच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची तयारी सुरु झाली आहे.
२००९ मध्ये शायनी अहुजा याच्यावर मोलकरणीने बलात्काराचा आरोप केला होता. पत्नी शहरात नसताना शायनीने माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप या मोलकरणीने केला होता. शायनीने हा आरोप नाकारला राहिला. पण डीएनए चाचणीत त्याने बलात्कार केल्याचे सिद्ध झाले आणि त्याला तुरूंगाची हवा खावी लागली.
या आरोपानंतर शायनीचे बॉलिवूडमधले करिअर संपुष्टात आले. मोठ्या ब्रेकनंतर शायनी २०१२ मध्ये ‘घोस्ट’ या सिनेमात दिसला. पण हा चित्रपट दणकून आपटला. यापश्चात २०१५ मध्ये ‘वेलकम बॅक’मधून त्याने कमबॅक केले. पण यातील शायनीची भूमिका इतकी छोटी होती की, त्याच्या या भूमिकेची साधी दखलही कुणी घेतली नाही. यानंतर शायनी मोठ्या पडद्यावरून पुरता गायब झाला. आता मात्र शायनीच्या आयुष्यावर बायोपिक आणण्याची तयारी सुरु झाली आहे.
डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, कुमार मंगत हे शायनीच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याच्या तयारीत आहेत. अर्थात अद्याप शायनीने या बायोपिकसाठी होकार दिलेला नाही.
२००३ मध्ये शायनीने ‘हजारो ख्वाहिशे ऐसी’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरचा उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ‘गँगस्टर’, ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन अ मेट्रो’ आणि ‘भूल भुलैया’असे अनेक हिट चित्रपट दिलेत. पण २००९ मध्ये शायनीवर बलात्काराचा आरोप लागला आणि त्याचे करिअर उध्वस्त झाले.