PS 2 Box Office Collection Day 1: ऐश्वर्या रायच्या 'पोन्नियिन सेल्वन'ची बंपर ओपनिंग, कमाई पाहून सलमान खानच्या चाहत्यांना लागेल झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 13:15 IST2023-04-29T13:14:37+5:302023-04-29T13:15:39+5:30
PS 2 Box Office Collection Day 1: ऐश्वर्या राय बच्चन आणि चियान विक्रमच्या पोन्नियिन सेल्वन म्हणजेच पीएसच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

PS 2 Box Office Collection Day 1: ऐश्वर्या रायच्या 'पोन्नियिन सेल्वन'ची बंपर ओपनिंग, कमाई पाहून सलमान खानच्या चाहत्यांना लागेल झटका
ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि चियान विक्रम(Chiyan Vikram)च्या पोन्नियिन सेल्वन (Ponniyan Selvan) म्हणजेच पीएसच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. दुसर्या भागात काय विशेष असेल हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे सलमान खान स्टारर किसी का भाई किसी की जानकडे प्रेक्षकांची गर्दी ओसरली आहे. ऐश्वर्या आणि विक्रमच्या पोन्नियिन सेल्वन २ने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिकच्या मते, दिग्दर्शक मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन: II म्हणजेच PS-2 ने भारतभर धमाकेदार सुरुवात करताना सर्व भाषांमध्ये ३२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशीही भरपूर कमाई होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर आपण सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान की' बद्दल बोललो तर, या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १५ कोटींची कमाई केली आहे, जी पोन्नियां सेल्वनच्या निम्म्यापेक्षा थोडी कमी आहे. मात्र, येत्या आठवडाभरात या दोघांचे काय होते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. पण चाहत्यांच्या रिव्ह्यूचा विचार केला तर ते म्हणतात की बाहुबलीच्या तुलनेत पोन्निया सेलवन जबरदस्त आहे.
पोन्नियन सेल्वनच्या पहिल्या भागाबद्दल बोलायचे तर, या चित्रपटाने जगभरात ५०० कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या भागाकडूनही चाहत्यांना अपेक्षा आहेत. कलाकारांबद्दल सांगायचे तर, PS-2 मध्ये विक्रम, जयम रवी, कार्ती, ऐश्वर्या राय, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला दिसत आहेत. हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलुगु, कन्नड आणि मल्याळममध्ये प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये तेलुगू भाषेत सर्वाधिक कमाई होत आहे.