कोल्ड प्लेच्या निमित्ताने बॉलिवूडकरांची जनजागृती आणि प्रबोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2016 05:50 PM2016-11-23T17:50:03+5:302016-11-23T17:50:03+5:30

ग्लोबल सिटीझन इंडिया फेस्टिव्हल पहिल्यांदाच भारतात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात समाज जागृतीसाठी कोल्ड प्ले या ब्रिटीश रॉक बँडच्या ...

Public awareness and awareness of Bollywood on the occasion of Cold Play | कोल्ड प्लेच्या निमित्ताने बॉलिवूडकरांची जनजागृती आणि प्रबोधन

कोल्ड प्लेच्या निमित्ताने बॉलिवूडकरांची जनजागृती आणि प्रबोधन

googlenewsNext
n style="color: rgb(34, 34, 34); font-family: mangal, serif; font-size: 12.8px;">ग्लोबल सिटीझन इंडिया फेस्टिव्हल पहिल्यांदाच भारतात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात समाज जागृतीसाठी कोल्ड प्ले या ब्रिटीश रॉक बँडच्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आले होते. लोकमत मीडिया पार्टनर असलेला हा कार्यक्रम जादूई संगीत आणि सामाजिक संदेशामुळे विशेष लक्षवेधी ठरला. ख्रिसच्या कोल्ड प्ले या कार्यक्रमाला आणि त्याच्या सामाजिक उपक्रमाला साथ देण्यासाठी लाखो तरुणाईसह बी-टाऊनची सेलिब्रिटी मंडळीसुद्धा बीकेसीच्या मैदानावर हजर होती.
SONAM kAPOOR AT GLOBAL CITIZEN FESTIVAL 2016

फॅशनिस्टा अशी ओळख असणा-या अभिनेत्री सोनम कपूरने यावेळी महिला सशक्तीकरणाचा संदेश उपस्थितांना दिला. फक्त संदेश देऊन सोनम थांबली नाही तर महिला सशक्तीकरणासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाहीसुद्धा तिने यावेळी दिली.
VIDYA BALAN AT GLOBAL CITIZEN FESTIVAL 2016

राष्ट्रीय स्वच्छता दूत असलेल्या अभिनेत्री विद्या बालन हिनेही या व्यासपीठाचा उपयोग स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी केला. सिनेमा हिट होण्यासाठी मनोरंजन मसाला गरजेचा आहे तसे देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या प्रगतीसाठी स्वच्छता आणि शौचालय गरजेचे असल्याचे विद्याने यावेळी सांगितले. मात्र यासाठी सरकारवर अवलंबून राहणे योग्य नसून प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे आवाहन विद्याने केले. यावेळी विद्याने सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचेही स्वागत केले. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी अशाप्रकारच्या निर्णयाची गरज असल्याचे तिने सांगितले. मात्र त्याचवेळी या निर्णयामुळे सामान्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल तिने दुःख आणि खंतही व्यक्त केली.


याशिवाय अभिनेता विवेक ओबेरॉय आणि अर्जुन कपूर याने या मंचावरुन स्त्री शिक्षणाचं महत्तव पटवून देत मुलगी शिकली प्रगती झाली हा संदेश दिला. ईस्ट इंडिया या स्टँड अप कॉमेडी ग्रुपनेही आपल्या परफॉर्मन्ससोबत मासिक पाळी आणि उघड्यावर शौच याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय सर्वशिक्षा अभियान, सगळ्यांचा विकास अशा विषयांवरही प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुणाने सूरांची जादू तर अनुभवलीच शिवाय समाजजागृती आणि प्रबोधनाचा उद्देशसुद्धा साध्य झाला.  

Web Title: Public awareness and awareness of Bollywood on the occasion of Cold Play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.