क्रिती खरबंदा झाली मिसेस सम्राट; थाटात पार पडला क्रिती -पुलकितचा लग्नसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 14:12 IST2024-03-16T14:10:52+5:302024-03-16T14:12:12+5:30
Pulkit- kriti wedding: पुलकित आणि क्रिती जवळपास ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली आहे.

क्रिती खरबंदा झाली मिसेस सम्राट; थाटात पार पडला क्रिती -पुलकितचा लग्नसोहळा
बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. एका पाठोपाठ एक अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात बांधले जात आहेत. नुकतीच रकुल प्रीत-जॅकी भगनानी, मीरा चोप्रा-रक्षित या जोडीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या नंतर आता कलाविश्वातील लोकप्रिय जोडी पुलकित सम्राट (Pulkit Samrat) आणि क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda ) ही जोडी लग्नाच्या बंधनात बांधली गेली आहे.
नुकतीच पुलकित आणि क्रितीने लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिल्ली एनसीआर येथील मानेसरच्या आयटीसी ग्रँड भारतमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने लग्नगाठ बांधली. १३ मार्चपासून ३ दिवस या जोडीचे लग्नापूर्वीचे कार्यक्रम सुरु होते. अखेर १५ मार्च रोजी या जोडीने साताजन्माची गाठ बांधली. या लग्नासाठी क्रितीने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर, पुलकितने लाइट ग्रीन रंगाची शेरवानी परिधान केली होती.
पाच वर्षांपासून डेट करतायेत पुलकित-क्रिती
पुलकित आणि क्रिती जवळपास ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनीस बाज्मी यांच्या 'पागलपंती' या सिनेमाच्या सेटवर या जोडीची पहिली भेट झाली होती. त्यानंतर, या दोघांमध्ये मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले.
पुलकितचं आहे हे दुसरं लग्न
क्रितीसोबत लग्न करण्यापूर्वी पुलकितने सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा हिच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर अवघ्या काही काळात ते विभक्त झाले.