पुलवामा हल्ल्यानंतर अजय देवगणने ‘टोटल धमाल’बद्दल घेतला हा मोठा निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 01:59 PM2019-02-18T13:59:07+5:302019-02-18T13:59:22+5:30
अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’बद्दल एक ताजी बातमी आहे. होय, खुद्द अजयने ही बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.
अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’बद्दल एक ताजी बातमी आहे. होय, खुद्द अजयने ही बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. येत्या २२ फेबु्रवारीला हा चित्रपट प्र्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. सध्या ‘टोटल धमाल’ची अख्खी टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान अजय देवगणने एक ट्वीट करत, ‘टोटल धमाल’ पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नसल्याची माहिती दिली आहे.
In light of the current situation the team of Total Dhamaal has decided to not release the film in Pakistan.
— Ajay Devgn (@ajaydevgn) February 18, 2019
‘सद्यस्थिती बघता, ‘टोटल धमाल’च्या टीमने आपला चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शिन न करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे अजयने ट्वीटटरवर जाहिर केले. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. या टिष्ट्वटआधी अजयने पुलवामा हल्ल्याचा निषेध करत,संताप व्यक्त केला होता. पुलवामातील या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहिद झालेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात संतापाचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशात आपला चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा ‘टोटल धमाल’ टीमचा निर्णय कौतुकास्पद म्हणायला हवा.
‘टोटल धमाल’ हा अजयच्या ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा सिनेमा आहे. या सीरिजचा पहिला भाग २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर २०११ मध्ये ‘डबल धमाल’ या सीक्वलने बॉक्स आॅफिसवर धूम केली होती. या चित्रपटात अजयशिवाय अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, बोमन ईराणी मुख्य भूमिकेत आहेत.या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १७ वषार्नंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.