Pulwama Attack : कंगना राणौतचा वार पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्टच्या जिव्हारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 12:29 PM2019-02-20T12:29:39+5:302019-02-20T12:32:19+5:30
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा संताप अनावर झाला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिनेही आपला संताप बोलून दाखवला. कंगनाचे हे वक्तव्य पाकिस्तानींच्या जिव्हारी लागले. पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्ट हिचा तर इतका जळफळाट झाला की, तिने थेट कंगनावर निशाणा साधला.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा संताप अनावर झाला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिनेही या भ्याड हल्ल्याचा निषेध करत, आपला संताप बोलून दाखवला. पाकिस्तानने केवळ आपल्या सुरक्षा व्यवस्थेवर हल्ला केला नाही तर उघडपणे आपल्याला आव्हान दिले आहे. भारताच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवून आपला अपमान केला आहे. आता पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची निर्णायक वेळ आली आहे,असे कंगना म्हणाली. केवळ इतकेच नाही तर या हल्ल्यानंतर जो शांततेबद्दल बोलेल त्याचे तोंड काळे करा. त्याची गाढवावर धिंड काढा, असेही कंगना म्हणाली. कंगनाचे हे वक्तव्य पाकिस्तानींच्या जिव्हारी लागले. पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्ट हिचा तर इतका जळफळाट झाला की, तिने थेट कंगनावर निशाणा साधला.
Recent tweets by Kangna are nothing but a face-saving opportunity and she used it well.
— Rabia Butt (@Iamrabiabutt) February 17, 2019
No more criticism on her for Manikarnika and suddenly she's voice of the nation.
Pro Tip: Whoever is facing difficulty in their profession, play National Card. #pulwamaattack#KangnaRanautpic.twitter.com/2AiqXoY4Me
कंगनाचे पाकिस्तानविरोधातील शब्द दुसरे काही नसून संधीसाधूपणा आहे. व्यवसायात समस्या येऊ लागल्यात की काही लोक ‘नॅशनल कार्ड’ खेळतात, असे ट्विट रबियाने केले आहे. विशेष म्हणजे, आपल्या या ट्विट मध्ये तिने कंगना राणौतला टॅग केले आहे. कंगनाचे पाकिस्तानविरोधी सूर रबियाला जराही रूचलेले नाहीत, हेच तिच्या या ट्विटवरून दिसतेय. आता फक्त कंगना रबियाला काय उत्तर देते, तेच बघायचेय.
कंगनाचा ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट गत २५ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. नुकतीच या चित्रपटाची १०० कोटीं क्लबमध्ये एन्ट्री झाली. ‘मणिकर्णिका’चे यश साजरे करण्यासाठी कंगनाने सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. गत १६ फेब्रुवारीला ही पार्टी होणार होती. मात्र पुलवामा हल्ल््यानंतर कंगनाने ही पार्टी रद्द केली होती.