सुप्रसिद्ध गायकाची भरधाव गाडी उलटली, सुदैवाने जीव वाचला, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 10:58 IST2024-01-25T10:49:56+5:302024-01-25T10:58:42+5:30
प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता सिप्पी गिल कार अपघातातून थोडक्यात बचावला.

सुप्रसिद्ध गायकाची भरधाव गाडी उलटली, सुदैवाने जीव वाचला, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता सिप्पी गिल कार अपघातातून थोडक्यात बचावला. अत्यंत भीषण अपघात होऊनही दैव बलवत्तर म्हणून सिप्पी गिल वाचला आहे. रस्त्यावरच कार पलटी झाली आणि गाडीचं पुर्ण नुकसान झालं आहे. पण त्याचा जीव वाचला हे महत्त्वाचं. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. अपघाताचा व्हिडीओ स्वतः सिप्पीने हा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामध्ये त्याची 'रुबिकॉन' कार उलटली. तो म्हणाला, "रुबिकॉन कारमधून मी एकटाच ऑफ-रोडिंग करायला निघालो. पण, जात असताना कार उलटली. मला गंभीर दुखापत झालेली नाही, परंतु कारचे मोठे नुकसान झाले आहे. एका इंग्रजाने मला मदत केली'. यासोबतच त्याने चाहत्यांना एक खास संदेशही दिला. तो म्हणाला, 'जीवन हे एक साहस आहे, काय होईल हे तुम्हाला कधीच माहीत नाही'.
सिप्पीची ही पोस्ट पाहिल्यानंतर लोक त्यांना प्रचंड ट्रोल करत आहेत. एका युजरनं लिहलं, 'एवढ्या मोठ्या अपघातानंतर सिप्पी इतका आनंदी का?' तर एकाने लिहलं, 'गाडी कशी चालवायची हेच माहिती नाही, मग तुम्ही गाडी का चालवता?'. तर काही युजरनं त्याला लक्ष देऊन गाडी चालवण्याचा सल्ला देत काळजी व्यक्त केली. सिप्पी गिल पंजाबी इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय आहेत. नुकतेच त्याचे 'सोलमेट' हे गाणे खूप गाजले. प्रसिद्ध गायकांच्या यादीत त्यांचा समावेश होतो.