"रुकेगा नहीं!" 'पुष्पा २' चा टिझर येतोय... तारीख ठरली; अल्लू अर्जुनचा 'बर्थ डे' ठरणार स्पेशल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 16:52 IST2023-03-20T16:52:12+5:302023-03-20T16:52:52+5:30
Allu Arjun's Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटानंतर प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

"रुकेगा नहीं!" 'पुष्पा २' चा टिझर येतोय... तारीख ठरली; अल्लू अर्जुनचा 'बर्थ डे' ठरणार स्पेशल
अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा 'पुष्पा: द राइज' (Pushpa) हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटानंतर प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या सीक्वेलसाठी निर्माते खूप मेहनत घेत आहेत. आता याबाबत एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पुष्पा २: द रुल'(Pushpa 2)चा टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी रिलीज होणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचा एक अॅक्शन सीन बंगळुरूमध्ये शूट केला जात आहे. लवकरच मल्याळम अभिनेता फहाद फाजील यात सामील होणार आहे. पुढील महिन्यात अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. अशा परिस्थितीत, निर्माते अभिनेत्याच्या खास दिवशी तीन मिनिटांचा अॅक्शन पॅक्ड टीझर रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. अल्लू अर्जुन ८ एप्रिल रोजी वाढदिवस साजरा करणार आहे.
'पुष्पा'च्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते त्याच्या सीक्वेलसाठी आणखी मेहनत घेत आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शक सुकुमारनेही टीझरच्या फायनल कटला होकार दिल्याचे बोलले जात आहे. संगीतकार देवी श्री प्रसाद सध्या टीझरमध्ये बॅकग्राउंड स्कोअर जोडत आहेत. चित्रपटाचा टीझर आणि इतर तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जात आहे की, 'पुष्पा २'मध्ये साई पल्लवी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 'पुष्पा' १७ डिसेंबर, २०२१ रोजी रिलीज झाला होता. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहद फाजील देखील दिसले होते.