Pushpa 2 : डबल धमाका! ‘पुष्पा 2’मध्ये अल्लू अर्जुनसोबत झळकणार साऊथचा ‘हा’ सुपरस्टार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 03:09 PM2022-12-11T15:09:15+5:302022-12-11T15:11:52+5:30

Pushpa 2 : ‘पुष्पा 2’बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. होय, चर्चा खरी मानाल तर ‘पुष्पा 2’मध्ये एका सुपरस्टारची एन्ट्री झाली आहे.

pushpa 2 ram charan to do cameo in allu arjun starrer film | Pushpa 2 : डबल धमाका! ‘पुष्पा 2’मध्ये अल्लू अर्जुनसोबत झळकणार साऊथचा ‘हा’ सुपरस्टार!!

Pushpa 2 : डबल धमाका! ‘पुष्पा 2’मध्ये अल्लू अर्जुनसोबत झळकणार साऊथचा ‘हा’ सुपरस्टार!!

googlenewsNext

देशभर धुमाकूळ घालणाऱ्या अल्लू अर्जुनच्या (Allu Ajrun) ‘पुष्पा-द राईज’ (Pushpa: the Rise) हा सिनेमा नुकताच रशियात रिलीज झाला. रशियातही या सिनेमानं धुमाकूळ घातला. अल्लूच्या या सिनेमानं लहानथोरांपर्यंत सर्वांनाच वेड लावलं. लवकरच या सिनेमाचा दुसरा पार्ट अर्थात ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) येतोय आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता या ‘पुष्पा 2’बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. होय, चर्चा खरी मानाल तर ‘पुष्पा 2’मध्ये एका सुपरस्टारची एन्ट्री झाली आहे.

रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2’मध्ये साऊथचा एक सुपरस्टार दिसणार आहे. हा सुपरस्टार कोण? तर रामचरण ( Ram Charan ). होय, सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात सुपरस्टार राम चरण कॅमिओ करणार असल्याचं कळतंय.अर्थात याबद्दलची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. पण‘पुष्पा 2’मध्ये रामचरण व अल्लू अर्जुनची जोडी धुमाकूळ घालणार, हे तर नक्की.  या बातमीने चाहते के्रझी झाले आहेत.   वर्षी रिलीज झालेल्या ‘आरआरआर’  चित्रपटानंतर रामचरणची लोकप्रियता वाढली आहे. अशात या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

‘पुष्पा- द राईज’च्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी आता ‘पुष्पा-द रूल’ ची घोषणा केली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटोही मध्यंतरी शेअर करण्यात आले होते. आता यातील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुनदेखील पुष्पा अवतारात शूटिंग सुरु करणार आहे.  चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचं समजताच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. पहिल्या भागाप्रमाणेच आता दुसऱ्या भागात काय रंजक असणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.  हा चित्रपट पुढील वर्षी 2024 मध्ये थिएटरमध्ये येऊ शकतो.

Web Title: pushpa 2 ram charan to do cameo in allu arjun starrer film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.