"हिंदी येत नसूनही बॉलिवूडमधला सर्वात मोठा अभिनेता", अल्लू अर्जुनबाबत राम गोपाल वर्मांचं मत, म्हणाले- "पुष्पा २..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:44 IST2024-12-09T13:43:17+5:302024-12-09T13:44:09+5:30
"पुष्पा २ हा पॅन इंडिया सिनेमा नाही तर...", दिग्दर्शक राम गोपाल वर्मांचं विधान चर्चेत, म्हणाले- "बॉलिवूडच्या इतिहासातील..."

"हिंदी येत नसूनही बॉलिवूडमधला सर्वात मोठा अभिनेता", अल्लू अर्जुनबाबत राम गोपाल वर्मांचं मत, म्हणाले- "पुष्पा २..."
Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 'पुष्पा २'ने अख्खं मार्केटच खाल्लं आहे. 'पुष्पा २'चे शोज हाऊसफूल होत आहेत. तर त्याबरोबरच बॉक्स ऑफिसवरही 'पुष्पा २' चांगली कमाई करत आहे. अल्लू अर्जुनच्या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आता या सिनेमाबाबत बॉलिवूडचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्वीटमधून भाष्य केलं आहे.
राम गोपाल वर्मा यांनी 'पुष्पा २' आणि अल्लू अर्जुनचं कौतुक केलं आहे. "बॉलिवूडच्या इतिहासातील सगळ्यात मोठा सिनेमा हा एक हिंदीत डब केलेला तेलुगु सिनेमा आहे. आणि बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा अभिनेता हा अल्लू अर्जुन एक तेलुगु अभिनेता आहे. ज्याला हिंदी बोलता येत नाही. त्यामुळे हे पॅन इंडिया नाही, तर तेलुगु इंडिया आहे", असं राम गोपाल वर्मा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
The BIGGEST HINDI FILM ever in HISTORY of BOLLYWOOD is a DUBBED TELUGU FILM #Pushpa2
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) December 8, 2024
The BIGGEST HINDI FILM ACTOR in HISTORY of BOLLYWOOD is a TELUGU ACTOR @alluarjun who CAN’T SPEAK HINDI
So it’s not PAN INDIA anymore , but it is TELUGU INDIA 💪💪💪
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा : द राइज' या सिनेमाचा हा सीक्वेल आहे. 'पुष्पा २ : द रुल'नंतर या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणादेखील करण्यात आली आहे. 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फाहद फासिल या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. सुकुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'पुष्पा २'ने चार दिवसांतच बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या सिनेमाला आत्तापर्यंत ५२९.४५ कोटींचा गल्ला जमवण्यात यश आलं आहे.