'पुष्पा 2'मध्ये काय आहे खास? ही 5 कारणे तुम्हाला चित्रपट पाहण्यास पाडतील भाग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 10:04 IST2024-12-05T09:59:57+5:302024-12-05T10:04:08+5:30
'पुष्पा 2: द रुल' हा थिएटरमध्ये का पाहावा, याची पाच कारण आहेत.

'पुष्पा 2'मध्ये काय आहे खास? ही 5 कारणे तुम्हाला चित्रपट पाहण्यास पाडतील भाग!
Pushpa 2 : अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2: The Rule) आज जगभरात प्रदर्शित झाला. सुकुमार दिग्दर्शित हा ॲक्शनपॅक्ड चित्रपट पहिल्या भागापेक्षा तिप्पट व्यवसाय करतोय. प्रेक्षकांची गर्दी थिएटरमध्ये पाहायला मिळतेय. ज्यांनी आज फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहिला त्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर 'पुष्पा 2: द रुल' हा थिएटरमध्ये का पाहावा, याची पाच कारण आहेत.
जेव्हा आपण चित्रपट मिस करतो, तेव्हा नंतर आपण पहिल्या दिवशी, फर्स्ट शो पाहायला का गेलो नाही याची खंत वाटते, अशी 'पुष्पा 2'ची क्रेझ आहे. हा चित्रपट पाहण्याचे एक मोठे कारण म्हणजे अल्लू अर्जुनचा नवीन लूक जर तुम्ही ट्रेलर नीट पाहिला असेल तर एका दृश्यात अल्लू अर्जुनने साडी, गळ्यात लिंबाची माळ आणि नाकात अंगठी घातलेली आहे. नव्या लूकसोबत यावेळी 'पुष्पराज' स्फोटक ॲक्शन करताना दिसतोय. पुष्पाच्या ॲक्शन पासून ते रोमॅन्सपर्यंत सर्वकाही पाहाण्याचा आनंद आणखी जवळून घेता येईल.
'पुष्पा 2: द रुल' मध्ये नव्या शत्रूंची एन्ट्री झाली आहे. पहिल्या भागात इन्स्पेक्टर भंवर सिंग शेखावत (फहद फसिल), जॉली रेड्डी (धनंजय) आणि मंगलम सिनू (सुनील) हे त्याचे शत्रू होते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते जगपती बाबू पुष्पा: द रुलमध्ये खलनायकाच्या भूमिकेत आहे. त्याच्या पात्राचे नाव कोगतम वीर प्रताप आहे. दोघांमधील ॲक्शन पाहण्यासोबतच त्यांच्यातील वैराचे कारण काय, हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे.
'पुष्पा: द राइज'मध्ये अल्लू अर्जुनचे 'पुष्पराज' हे पात्र केवळ त्याच्या देशातील काही भागातच लाल चंदन विकत असल्याचे आपण पाहिलं होतं. पण, 'पुष्पा-2'मध्ये ही तस्करी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचली आहे. ज्यामुळे कथेत नवा ट्विस्ट आहे. 2021 मध्ये जेव्हा 'पुष्पा' प्रदर्शित झाला होता, तेव्हा अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडलं होतं. आता तीच मोहिनी 'पुष्पा 2: द रुल' मध्ये रश्मिका मंदाना प्रेक्षकांना घालतेय. तिची व्यक्तिरेखा पहिल्या भागापेक्षा अधिक मनोरंजक आहे.