'पुष्पा'ची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, ५०० कोटींच्या ऐतिहासिक सिनेमातही केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 14:26 IST2022-03-12T14:25:59+5:302022-03-12T14:26:29+5:30
अल्लू अर्जुन (Allu Arjun)चा 'पुष्पा' (Pushpa Movie) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. 'पुष्पा' रिलीज होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप 'पुष्पा'चा फिव्हर कायम आहे.

'पुष्पा'ची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, ५०० कोटींच्या ऐतिहासिक सिनेमातही केलंय काम
अल्लू अर्जुन (Allu Arjun)चा 'पुष्पा' (Pushpa Movie) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. पुष्पा रिलीज होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप पुष्पाचा फिव्हर अद्याप कायम आहे. अल्लू अर्जुनपासून ते त्याचा मित्र केशवपर्यंत चित्रपटात चर्चेत आहे. तसेतर, चित्रपट पाहून असे वाटते की दिग्दर्शकाने पुष्पाचे प्रत्येक पात्र अतिशय विचारपूर्वक आणि अचूकपणे चित्रित केले आहे. मग ती आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदान्ना असो किंवा अभिनेत्री 'दक्षिणायनी' अर्थात अनुसया भारद्वाज. या सर्व पात्रांमध्ये, आज आम्ही तुम्हाला अल्लू अर्जुनची ऑनस्क्रीन आई म्हणजेच पुष्पाची आई कल्पलथाबद्दल सांगणार आहोत. खऱ्या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आहे.
कल्पलता ही दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'पुष्पा'च्या यशापूर्वी कल्पलता आणखी एका सुपरहिट चित्रपटात दिसली होती आणि तो चित्रपट होता प्रभासचा 'बाहुबली'. 'बाहुबली'मध्ये कल्पलथाची भूमिका फारशी नव्हती, पण गावकऱ्यांमध्ये तिचा सामावेश होता. पण, ती त्यांच्यात आघाडीवर होती. 'बाहुबली' व्यतिरिक्त, कल्पलथा अनुष्का शेट्टीच्या 'भागमती' आणि विजय देवरकोंडाच्या 'अर्जुन रेड्डी' सारख्या हिट चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे.
कल्पलथा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की हिला तुम्ही पुष्पा आणि बाहुबलीमध्ये पाहिले होते.
पुष्पा या चित्रपटात कल्पलथा एका गरीब आईच्या भूमिकेत दिसली. विशेष बाब म्हणजे अल्लू अर्जुन आणि कल्पलता यांच्या वयात फक्त ५ वर्षांचे अंतर आहे. अभिनेता ३९ वर्षांचा आहे आणि कल्पलथा ४५ वर्षांचा आहे.