Pushpa फेम दक्षायिणीला नेटकरी म्हणाला होता 'आंटी', अभिनेत्रीनं बोल्ड फोटो शेअर करून केली बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 01:20 PM2022-03-04T13:20:43+5:302022-03-04T13:21:06+5:30
Pushpa फेम अनसूया भारद्वाज(Anasuya Bharadwaj)ने नुकतेच तिच्या सोशल अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत ज्यात ती बोल्ड अंदाजात दिसते आहे.
अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) स्टारर 'पुष्पा: द राइज' (Pushpa Movie) हा चित्रपट देशभर आणि जगभरात हिट ठरला. चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य स्टारकास्टची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. ‘पुष्पा’चा मुख्य अभिनेता पुष्पराजने दबदबा तर ठेवलाच पण त्यासोबतच बाकीच्या कलाकारांचा अभिनयही प्रेक्षकांना खूप भावला. मात्र, आता आम्ही पुष्पा चित्रपटात दक्षायिणीची भूमिका साकारणाऱ्या अनसूया भारद्वाज(Anasuya Bharadwaj)बद्दल बोलत आहोत. तिने नुकताच तिचा ग्लॅमरस अवतार सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनसूया भारद्वाजने नुकतेच तिच्या सोशल अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत ज्यात ती बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. लेटेस्ट फोटोंमध्ये, अनुसयाने एक शॉर्ट डेनिम पॅण्ट परिधान केली आहे. अनसूया भारद्वाज पुष्पा चित्रपटात एका मोठ्या स्मगलर आणि गँगस्टरच्या खतरनाक बायकोच्या भूमिकेत दिसली होती. फोटोमध्ये अनसूया भारद्वाज कॅज्युअल लूकमध्ये लोकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून विश्वास बसत नाही की ही तीच पुष्पातील दक्षयिणी आहे जी तिच्याच नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न करते.
ही भूमिका केल्यानंतर अनसूया भारद्वाजलाही एज शेमिंगला बळी पडावे लागले होते. नुकतेच एका युजरने तिला सोशल मीडियावर अपमानास्पद प्रश्न विचारला होता, मात्र अभिनेत्रीने असे उत्तर दिले की तिची बोलतीच बंद झाली.
खरेतर सोशल मीडियावरील एका युजरने तिला वयावरून लाज वाटेल असा प्रश्न केला होता आणि म्हटले होते की तुला आक्का बोलू की बहिण की आंटी? त्यावर सडेतोड उत्तर देत अभिनेत्रीने लिहिले होते की, तू मला ओळखतदेखील नाही. हे नाव वयाला लाजवणारे किंवा एज शेमिंग आहे. असे प्रश्न करून तुमच्यावर झालेले संस्कार समजतात. अनुसयाला युजरने आक्का म्हटलेले आवडले नाही आणि तिनेदेखील याला एज शेमिंग म्हटले. त्यावर त्या युजरने पुढे म्हटले होते की, अभिनेत्रीला प्रशंसादेखील स्वीकारली नाही पाहिजे. त्या युजरला प्रतिक्रिया देत अनुसया म्हणाली की, विचार महत्त्वाचा असतो. मला काय म्हणायचे आहे, हे तुम्हाला कळले असेल अशी मी आशा करते.