रश्मिका मंदाना प्रेम आणि लाइफ पार्टनरबाबत काय म्हणाली? कसा हवाय तिला पार्टनर?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 06:07 PM2022-02-17T18:07:27+5:302022-02-17T18:08:13+5:30
Rashmika Mandana : रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे तिच्या फॅन्सना तिच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्याची इच्छा असते. तसं तिचं नाव साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत अनेकदा जोडलं.
'पुष्पा' या सुपरहिट सिनेमाची अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) सिनेमा हिट झाल्यापासून चांगलीच चर्चेत आहे. रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे तिच्या फॅन्सना तिच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्याची इच्छा असते. तसं तिचं नाव साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत अनेकदा जोडलं. पण अनेकदा तिने स्पष्ट केलं आहे की, ते केवळ चांगले मित्र आहेत. अशात आता तिने इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत प्रेम आणि लग्नाबाबत मोकळेपणाने गप्पा मारल्या.
प्रेमाबाबत प्रश्न विचारल्यावर अभिनेत्रीने सांगितलं की, प्रेमाला दोन शब्दात व्यक्त करणं फार अवघड आहे. कारण ही एक भावना आहे. माझ्यासाठी प्रेम ते आहे ज्यात दोघे एकमेकांना सन्मान देतात. एकमेकींसाठी वेळ देतात. प्रेम तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा ते दोन्हीकडून असतं. एकीकडून नाही.
लग्नाबाबत काय म्हणाली रश्मिका?
रश्मिकाला जेव्हा विचारलं की, ती लग्न कधी करणार तर ती म्हणाली की, मला अजून त्याबाबत माहीत नाही कारण मी त्याबाबत कधी काही विचार केला नाही. मला वाटतं की, मी लग्नासाठी अजून लहान आहे. आपल्या आवडीबाबत आणि पार्टनरबाबत ती म्हणाली की, आपला पार्टनर असा असावा, ज्याच्यासोबत तुम्हाला कन्फर्टेबल वाटेल.
आतापर्यंत रश्मिकाने साऊथमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण आता ती बॉलिवूडमध्येही डेब्यू करणार आहे. रश्मिका मंदाना आगामी बॉलिवूड सिनेमा 'मिशन मजनू' मध्ये काम करत आहे. ज्यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. बॉलिवूडचे महानायक अभिनेता अमिताभ बच्चनसोबतही ती एका सिनेमात काम करत आहे.
'पुष्पा'मध्ये रश्मिका मंदानाने साकारलेली श्रीवल्लीची भूमिका खूप पसंत केली जात आहे. या तिची अल्लू अर्जुनसोबतची जोडी सुपरहिट झाली आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिस कलेक्शनचे अनेक रेकॉर्ड कायम केले आहेत. अशात आता या सिनेमाचा सीक्वलही येणार आहे. पुष्पाच्या सीक्वलची शूटींग मार्चमध्ये सुरू होईल आणि सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज करण्याची तयारी आहे.