घटस्फोट घेतेस मग आयटम साँग्स कसले करतेस; 'ऊ अंटावा'साठी समंथला झाला होता जबर विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 04:51 PM2023-03-29T16:51:35+5:302023-03-29T16:52:55+5:30
Samantha ruth prabhu: समंथाने अभिनेता नागा चैतन्य याच्याशी २०१७ मध्ये लग्न केलं होतं. मात्र, २०२१ मध्ये या दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला.
कायम चर्चेत असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समंथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu). दाक्षिणात्य कलाविश्वातील या अभिनेत्रीची बॉलिवूडमध्येही क्रेझ आहे. त्यामुळे तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफचीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते. यात अलिकडेच तिची मुलाखत चर्चेत आली आहे. अल्लू अर्जूनच्या सुपरहिट ठरलेल्या 'पुष्पा' (pushpa) या सिनेमात समंथाने आयटम साँग केलं होतं. मात्र, यासाठी तिच्या घरातल्यांनी तिचा कडाडून विरोध केला होता. एका मुलाखतीत तिने याविषयी भाष्य केलं आहे.
पुष्पासिनेमातलं ऊ अंटावा हे गाणं समंथाच्या करिअरमधलं टर्निंग पॉईंट ठरलं आहे. मात्र, या गाण्याची ऑफर ज्यावेळी तिच्याकडे आली त्यावेळी तिच्या पर्सनल आयुष्यात अनेक चढउतार सुरु होते. त्यामुळे तिने हे गाणं करु नये असं तिच्या कुटुंबियांना आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना वाटत होतं.
"ज्यावेळी मला या गाण्याची ऑफर मिळाली त्यावेळी आमच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु होती. आम्ही घटस्फोट घेतोय हे ज्यावेळी सगळ्यांना सांगितलं. त्यावेळी, मी हे गाणं करु नये असं माझ्या कुटुंबियांना आणि जवळच्या व्यक्तींना वाटत होतं. अनेकांनी मला त्यावेळी सल्लेही दिले होते", असं समंथा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "तू घटस्फोट घेतेस आणि आयटम सॉग्स कसले करतेस? असा प्रश्न मला विचारला जात होता. मात्र, मी हे गाणं करणार असं ठामपणे सगळ्यांना सांगितलं. मी माझ्या आयुष्यात घडत असलेल्या गोष्टी का लपवू?, मी काही चुकीचं तर करत नाहीये,मग मी उगाच अपराध्यासारखं का राहू. मी माझ्या वैवाहिक जीवनात माझे १०० टक्के दिले होते. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे ज्या गोष्टी मी केल्याच नाहीत त्याची शिक्षा मी उगाच का भोगू?"
दरम्यान, समंथाने प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य (naga chaitanya) याच्याशी २०१७ मध्ये लग्न केलं होतं. मात्र, २०२१ मध्ये या दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर समंथाने तिचं लक्ष कामाकडे केंद्रित केलं असून तिचा शाकुंतलम हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १४ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.