दीपिका पादुकोण बनणार का पी.व्ही. सिंधू?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2017 08:08 AM2017-05-01T08:08:38+5:302017-05-01T13:38:38+5:30

मिल्खा , मॅरीकॉम, एम. एस.धोनी अशा अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर बेतलेले सिनेमे लोकांच्या पसंतीत उतरल्यानंतर अशा चित्रपटांना सुगीचे दिवस येणारच. ...

PV to become Deepika Padukone Indus? | दीपिका पादुकोण बनणार का पी.व्ही. सिंधू?

दीपिका पादुकोण बनणार का पी.व्ही. सिंधू?

googlenewsNext
ल्खा , मॅरीकॉम, एम. एस.धोनी अशा अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर बेतलेले सिनेमे लोकांच्या पसंतीत उतरल्यानंतर अशा चित्रपटांना सुगीचे दिवस येणारच. त्याचमुळे सध्या बॉलिवूडमध्ये क्रिडा जगतातील दिग्गजांच्या आयुष्यावर बेतलेले बायोपिक बनवण्याचे चलन आले आहे. आता या यादीत  आणखी एक नाव सामील झाले आहे. होय, हे नाव आहे, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिचे. पी. व्ही. सिंधू हिच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा लवकरच आपल्याला पाहायला मिळू शकतो. हे बायोपिक अभिनेता सोनू सूद प्रोड्यूस करणार, अशीही माहिती आहे.



ALSO READ : दीपिका पादुकोण दिग्दर्शक दिनेश विजानवर झाली फिदा!

आता या बायोपिकमध्ये पी. व्ही. सिंधूची भूमिका कोण साकारणार, हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सूक असाल. आमच्या माहितीप्रमाणे, बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण ही सिंधूच्या भूमिकेत दिसू शकते. अर्थात याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पण सोनू सूद हे बायोपिक प्रोड्यूस करणार, हे मात्र नक्की आहे. गतवर्षी सोनूने आपल्या शक्ती सागर प्रॉडक्शनची सुरुवात केली होती. शक्ती सागर प्रॉडक्शन सोनूच्या वडिलांच्या नावावर आहे. ‘तुतक तुतक तुतिया’ हा सोनूच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट. 
पी. व्ही. सिंधू ही २१ वर्षांची बॅडमिंटनपटू बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनमध्ये तिसºया क्रमांकावर आहे. २०१६ च्या आॅलम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. सिंधूच्या भूमिकेत दीपिकाला पाहणे निश्चितपणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत तरी आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. तूर्तास दीपिका ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. या चित्रपटात दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकाशिवाय रणवीर सिंह आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: PV to become Deepika Padukone Indus?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.