प्यार, इश्क, मोहब्बत अन् कन्फ्यूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2016 03:54 PM2016-12-13T15:54:58+5:302016-12-13T16:19:11+5:30

बॉलिवूडमध्ये एखादी थीम प्रेक्षकांच्या पचनी पडली की, त्याच थीमवर आधारित किमान डझनभर सिनेमे प्रेक्षकांसमोर आणले जातात. जसे की, ‘स्पोर्ट्स’ ...

Pyaar, Ishq, Mohabbat and Confusion | प्यार, इश्क, मोहब्बत अन् कन्फ्यूजन

प्यार, इश्क, मोहब्बत अन् कन्फ्यूजन

googlenewsNext
लिवूडमध्ये एखादी थीम प्रेक्षकांच्या पचनी पडली की, त्याच थीमवर आधारित किमान डझनभर सिनेमे प्रेक्षकांसमोर आणले जातात. जसे की, ‘स्पोर्ट्स’ या एकाच विषयावर गेल्या वर्षाभरात अर्धा डझनपेक्षा अधिक सिनेमांची निर्मिती केली गेली. यातील काही सिनेमांनी बॉक्स आॅफिसवर दबदबा निर्माण केला तर काहींनी सिनेमांच्या बजेटच्या तुलनेत सरासरी कमाई केली. स्पोर्टस्प्रमाणेच आणखी एक थीम गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये हमखास वापरली जात आहे. ‘पडद्यावर लव्ह स्टोरी रंगवायची अन् कमिटमेंटची भीती दाखवायची’ अशी ही थीम आहे. अशा थीमचा यूथ सर्वाधिक प्रेक्षक असून, हे सिनेमे बॉक्स आॅफिसवर गल्ला जमविण्यात यशस्वी होत आहेत. जाणकारांच्या मते हल्लीच्या तरुणांची रिअल लाइफमधील प्रेमकहाणी या थीमच्या सिनेमांशी मिळतीजुळती असल्यानेच हे सिनेमे त्यांच्या पसंतीस उतरत आहेत. आता पुन्हा आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर ‘ओके जानू’ या सिनेमातून ही थीम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, त्यात ‘प्यार, इश्क, मोहब्बत अन् कन्फ्यूजन’ अर्थात ‘प्रेम आणि कमिटमेंटची भीती’ ही थीम स्पष्टपणे बघावयास मिळत आहे. या थीमवर आधारित असलेल्या सिनेमांचा घेतलेला हा आढावा...



बेफिक्रे 
गेल्या शुक्रवारी रिलीज झालेला ‘बेफिक्रे’ हा सिनेमादेखील अशाच धाटणीचा आहे. सिनेमात रणवीर आणि वाणी सुरुवातीपासून विचार करीत असतात की, आपण एकमेकांच्या प्रेमात पडायला नको. मात्र जेव्हा त्यांना समजते की, दोघेही या नात्यात खूप पुढे गेले आहेत तेव्हा ते एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. मैत्रीचे नाते निर्माण करण्याचाही ते प्रयत्न करतात. 



बार - बार देखो
या सिनेमात कमिटमेंटपेक्षा कन्फ्यूजनच अधिक दाखविण्यात आले. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रामध्ये लग्नावरून खूपच कन्फ्यूजन असते. तो लग्न करायला घाबरतो. कदाचित हीच बाब प्रेक्षकांच्या पचनी पडली नसावी. मात्र सिनेमामध्ये सिद्धार्थ आणि कॅटरिनाच्या जोडीचे भरपूर कौतुक केले गेले. कॅटरिनाचा हॉट अंदाज प्रेक्षकांना भावला. तसेच काला चष्मा हे गाणेही २०१६ मधील जबरदस्त हिट ठरले.



लव आज कल
या सिनेमात सैफ अली खान आणि दीपिका पादुकोन एकमेकांना जीवापाठ प्रेम करीत असल्याचे दाखविण्यात आले. परंतु ही गोष्ट सांगण्यास दोघेही शेवटपर्यंत घाबरत असतात. दीपिकाची सैफसोबतची केमिस्ट्री चांगली जमली होती. युथमध्ये हा चित्रपट चर्चिला गेला. 



एक मै और एक तू
या सिनेमात इमरान खान आणि करिना कपूर यांचीदेखील अशीच कथा दाखविण्यात आली आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात असतात, परंतु त्यांच्यातील कन्फ्यूजन मात्र कायम असते. मैत्री की प्रेम हा सिनेमाच्या अखेरपर्यंतचा मुद्दा असतो. विशेष म्हणजे सिनेमाचा शेवट कन्फ्यूजननेच दाखविण्यात आला आहे. 



तमाशा
कमिटमेंटची प्रचंड भीती दाखविण्यात आलेल्या या सिनेमाची कथाही प्रेमामधील अडथळ्यांवर आधारित असल्याचे दाखविण्यात आले. रणबीर कपूर प्रेम आणि स्वत:वरून कन्फ्यूज असतो. कदाचित हल्लीच्या यूथमधील हे वास्तव असल्याचे सिनेमातून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. सरासरी कमाई केलेल्या या सिनेमातील रणबीर आणि दीपिकाची जोडी युथ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 



सलाम नमस्ते
सैफ अली खान आणि प्रीती जिंटा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सलाम नमस्ते’ या सिनेमाची कथाही याच थीमवर आधारित आहे. भलेही गर्लफ्रेंड प्रेग्नेंट असली तरी कमिटमेंटविषयी अखेरपर्यंत कन्फ्यूजन असल्याचे सिनेमात दाखविण्यात आले आहे.

Web Title: Pyaar, Ishq, Mohabbat and Confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.